AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पापा गेले ..,’ जेव्हा प्रियांका यांनी दिली ती वाईट बातमी, सोनिया गांधी यांनी पुस्तकात सांगितली त्या भयानक क्षणाची कहाणी

सोनिया गांधी यांनी राजीव गांधींच्या हत्येची बातमी येण्यापूर्वीचे दिवस कसे गेले याचे वर्णन आपल्या पुस्तकात केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, त्या आणि त्यांची मुलगी प्रियांका गांधी, राजीव गांधींच्या निवडणूक प्रचार रॅलीतून नुकत्याच परतल्या होत्या. मात्र, प्रचारामुळे आलेला थकवा अजूनही गेलेला नव्हता.

'पापा गेले ..,' जेव्हा प्रियांका यांनी दिली ती वाईट बातमी, सोनिया गांधी यांनी पुस्तकात सांगितली त्या भयानक क्षणाची कहाणी
SONIA GANDHI BOOK
| Updated on: Nov 10, 2026 | 8:45 PM
Share

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे पुस्तक ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ मंगळवारी प्रकाशित झाले आहे. सात भाग असलेल्या या पुस्तकात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया यांनी अनेक प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.या पुस्तकात त्यांच्या जीवनातील खाजगी आणि वेदनादायक काळाचाही उल्लेख केला आहे. त्यांनी मे १९९१ मध्ये त्यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येशी संबंधीत गोष्टींचाही उल्लेख केला आहे.

सोनिया गांधी यांनी सांगितले की राजीव गांधी यांच्या हत्येची बातमी मिळण्याआधी काही दिवस कसे होते. त्यांनी लिहिले की त्या आणि त्यांची कन्या प्रियंका गांधी यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावरुन परतले होते. मात्र, प्रचारादौऱ्यातील थकवा अजून संपला नव्हता. त्यांनी सांगितले की त्या रायबरेलीमध्ये राजीव गांधी भेटू शकल्या नव्हत्या. दिल्लीतही त्यांच्या सोबत मुश्कीलीने एक दिवस व्यतीत करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर राजीव गांधी पुन्हा निवडणूक प्रचाराला रवाना झाले होते. प्रियंका काही दिवसांसाठी त्यांच्या सोबत थांबली होती. १० मे रोजी रायबरेलीमध्ये वडीलांनी भेटण्याची योजना तिच्या मनात सुरु होती.

बर्थडे पार्टीला जात होती प्रियंका गांधी

सोनिया गांधींनी लिहिलंय की त्या हे पाहून हैरान झाल्या होत्या की त्यांचे पती राजीव गांधी किती थकले होते. ते अनेक दिवस सातत्याने निवडणूक प्रचार करत होते आणि संपूर्ण देशाचा दौरा करत होते. त्यांनी लिहीलंय की जेव्हा ते बाहेर असायचे तेव्हा मला त्यांची चिंता लागलेली असायची. त्यारात्री बेडरुममध्ये टेबल लँपच्या उजेडाने सावल्या लांबल्या होत्या. मी एक पुस्तक उघडून वाचू लागले होते. सोनिया गांधी यांनी सांगितले की त्यांची कन्या प्रियंका यांनी आधीही अनेकदा त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला होता. ती तिच्या एका मित्राच्या २१ व्या जन्मदिनाच्या पार्टीला जाण्याची तयारी करत होती. प्रियंका बाहेर कमी जायची. मात्र, त्या दिवशी ती वेगवेगळे कपडे परिधान करुन सोनिया यांना त्यांचा ड्रेस दाखवत त्यांची प्रतिक्रीया विचारत होती.

प्रियंकाने दिली ती बातमी…

सोनिया गांधी यांनी लिहीलंय की काही वेळाने प्रियंकाने हळूच त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत आली. ती खूप सांभाळून पावले ठेवत होती. जसे स्वत:ला शांत राखण्याचा प्रयत्न करत असावी. परंतू तिचे वेगाने आणि न थांबता वेगाने श्वास घेणे, आणि उतरलेला चेहरा आणि डोळ्यातील खोल चिंता, बेचैनी सांगत होती काही तरी खूपच वाईट घडले आहे.

त्यानंतर प्रियंकाने तिच्या आईला फोनवर मिळालेली बातमी सांगितली. सोनिया गांधी यांनी लिहिलंय की प्रियंकाने म्हटले की त्यांना आता एक फोन आला आहे. एक बॉम्बस्फोट झाला आहे. आणि सांगितले जात आहे की पापाच्या आसपास उपस्थित १२ लोकांचा मृ्त्यू झाला आहे, परंतू ते सुरक्षित आहेत. मात्र, प्रियंका यांना या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या आईला सांगितले की जर १२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर पापा देखील जखमी झाले असतील. ते हॉस्पिटलमध्ये असतील. आपल्याला मद्रास जायला हवे, तुम्ही लवकर तयार व्हा.’

पापा आता राहिले नाही…

सोनिया गांधी यांनी लिहीलंय की त्या वेळी त्यांना कळत नव्हते की प्रियंका अखेर काय सांगत आहे. प्रियंका खूप घाईघाईने बोलत होती आणि तिचे बोलणे सोनियांना नीटपणे समजून येत नव्हते. त्यांनी लिहिलंय की मी विचार करत होते की मद्रासला काय जायचे आहे ? काय राजीव मद्रास येथे होते ?कोणता स्फोट झाला आहे. सोनियांच्या मते प्रियंकाच्या शब्दांपेक्षा त्यांच्या आवाजात लपलेली भीती त्यांना हे समजण्यास पुरेशी होती की अखेर काही तरी खूप वाईट झाले आहे. हे समजतात त्यांचे श्वास थांबू लागले. त्या बिछान्यावरुन उठल्या आणि प्रियंकाच्या जवळ गेल्या तिला कवेत घेतले. त्यांनी लिहिलंय की मला जाणवत होते की प्रियंकाचे हृदय माझ्या छातीशी कवटाळून अधिक वेगाने धडधडत होते.

सोनिया गांधींनी लिहिले आहे की प्रियांका त्यांना म्हणाली, “मी ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करते. मिस्टर जॉर्ज म्हणाले होते की ते सर्व तपशील मिळवून आम्हाला कळवतील, पण मला अजून त्यांचा फोन आलेला नाही. ते फोनला उत्तरही देत ​​नाहीत.” मिस्टर जॉर्ज म्हणजे व्हिन्सेंट जॉर्ज, जे राजीव गांधींचे वैयक्तिक सचिव होते. नंतर त्यांनी सोनिया गांधींसोबतही काम केले. सोनिया गांधींच्या म्हणण्यानुसार, प्रियांका काही वेळाने परत आली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर असे भाव होते जे सोनियांना लगेच समजले. प्रियांका एका छोट्या खोलीत त्यांच्यासमोर उभी होती. त्यानंतर तिने जे म्हटले, त्याने सोनिया गांधींचे जग हादरवून टाकले. सोनिया गांधींनी लिहियंक की प्रियांका म्हणाली की “पापा आता राहिले नाहीत.”

त्या म्हणाल्या की हे ऐकल्यानंतर त्यांनी प्रियांकाच्या डोळ्यांत पाहिले. त्यांना आशा होती की हे फक्त एक वाईट स्वप्न असावे आणि त्या काही वेळाने जाग्या होतील. पण प्रियांकाच्या डोळ्यांतील वेदना आणि भीतीने सत्य उघड केले. प्रियांकासुद्धा त्यांच्याकडेच पाहत होती आणि तिच्या डोळ्यांत तिच्या आईची भीती स्पष्टपणे दिसत होती.

सोनिया गांधी पूर्णपणे खचून गेल्या

आपल्या आत्मचरित्रात त्या क्षणाची आठवण सांगताना सोनिया गांधींनी लिहिले आहे की, राजीव गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. त्या आपली मुलगी प्रियांकाच्या मिठीत कोसळल्या आणि वारंवार पुटपुटत राहिल्या, “मी त्यांच्यासोबत जायला हवं होतं. मी त्यांच्यासोबत का नाही गेले?” त्यावेळी प्रियांका शांत होती. सोनिया गांधींनी सांगितले की, त्यांना या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. कदाचित हे खरे नसेल, अशी आशा त्यांनी अजूनही बाळगली होती. अखेरीस, त्यांनी राजीव गांधींचे खाजगी सचिव, व्हिन्सेंट जॉर्ज यांना फोन केला आणि विचारले, “फक्त मला सांगा, हे खरं आहे का?” व्हिन्सेंट जॉर्ज यांचा आवाज कापरा झाला. ते म्हणाले, “हो, हे खरं आहे. साहेब आता हयात नाहीत.”

सोनिया गांधींनी लिहिले आहे की, हे ऐकून त्यांचे संपूर्ण जग कोसळले. जणू काही त्यांच्या सभोवताली अंधार पसरला आहे आणि तो अंधार त्यांना संपूर्णपणे गिळंकृत करत आहे, असे त्यांना वाटले. त्यांनी पुढे लिहिले की, प्रियांकाने त्यांना खाली बसवले आणि आपल्या मिठीत घट्ट धरले. त्या क्षणी, त्या स्वतःला आवरू शकल्या नाहीत आणि ढसाढसा रडत होत्या. त्यांचे पती, राजीव गांधी, आता हयात नाहीत, अशी त्यांची खात्री पटली होती.

सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले की, त्यावेळी त्यांचे दुःख इतके तीव्र होते की, राजीव गांधींशिवाय जगण्यात त्यांना काही अर्थ दिसत नव्हता. त्यांनी लिहिले, “मला मरायचे होते. मला त्यांच्याशिवाय जगायचे नव्हते.”

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?