AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Rashi Bhavishya: दिवाळी पाडव्याचा दिवस कोणासाठी शुभ, तर कोणाला घ्यावी लागणार काळजी? जाणून घ्या राशीभविष्य

Horoscope Today Tuesday 10 November 2026: दिवाळी पाडव्याचा दिवस काही राशींसाठी आनंददायी, तर काहींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. मेष ते मीन या १२ राशींपैकी कोणाला आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश आणि नात्यांमध्ये आनंद मिळणार, तर कोणत्या राशींनी काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या सविस्तर राशीभविष्य.

Today Rashi Bhavishya: दिवाळी पाडव्याचा दिवस कोणासाठी शुभ, तर कोणाला घ्यावी लागणार काळजी? जाणून घ्या राशीभविष्य
राशीभविष्यImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 10, 2026 | 10:44 AM
Share

10 नोव्हेंबर 2026 रोजी मंगळवार असून, या दिवशी दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साजरी केली जाणार आहे. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी अनेक जण नवीन कामांची सुरुवात करतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी यासाठी पूजा करतात. मंगळवार हा दिवस हनुमानजींच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने भीती, संकटे आणि अडचणी दूर होतात. ज्योतिषीय गणनेनुसार, दिवाळी पाडव्याचा दिवस काही राशींसाठी शुभ, तर काहींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन या 12 राशींचे भविष्य.

मेष

घर आणि आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास तणाव कमी होईल. कामांची योग्य विभागणी करा आणि छोटी उद्दिष्टे ठेवा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधींसाठी तयार राहता येईल.

वृषभ

घर आणि कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. योग्य नियोजनामुळे आयुष्यात स्थैर्य, विश्वास आणि शांतता टिकून राहील. सातत्याने प्रगती करण्यावर आणि व्यावहारिक निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करा.

मिथुन

संतुलित आणि कामाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. एखाद्या कामाला उशीर झाल्यास संयम ठेवा. इतरांशी प्रेमाने संवाद साधा. छोट्या यशाचा आनंद घ्या. स्वतःची काळजी घ्या.

कर्क

हळूहळू प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येईल. महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. दिलेली आश्वासने पूर्ण करा. घरात आणि कामाच्या ठिकाणी केलेल्या छोट्या सुधारणांमुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी दिसू लागतील.

सिंह

आर्थिक स्थिती चांगली राहिल. या आठवड्यात कामांना गती मिळेल. छोटे पण योग्य निर्णय घेतल्यास नातेसंबंध, काम आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात.

कन्या

आरोग्य आणि आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल ठरेल. पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंधातील समस्या सोडवण्यासाठी योग्य पर्याय निवडा. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळू शकते.

तूळ

मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रेमसंबंध अधिक आनंददायी करण्यासाठी प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन पावले उचलण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक

आर्थिक स्थिती आणि आरोग्य चांगले राहिल. नातेसंबंधांमधील मतभेद दूर करण्यावर भर द्या. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा भूमिका स्वीकारण्याची संधी मिळू शकते.

धनु

आरोग्याच्या बाबतीत किरकोळ अडचणी जाणवू शकतात. प्रेमसंबंध आणि व्यावसायिक आयुष्य यांचा चांगला समतोल राखता येईल. शेअर बाजाराशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याचा विचार करू शकता.

मकर

आर्थिक व्यवहारांमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रेमसंबंधातील अडचणी सोडवण्यासाठी योग्य मार्ग शोधता येईल. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळू शकते. आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल.

कुंभ

प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक आणि आरोग्याच्या बाबतीत दिवस सकारात्मक ठरू शकतो.

मीन

प्रेमसंबंधांच्या दृष्टीने दिवस चांगला राहिल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. कामातील उत्पादकता वाढण्यास मदत होईल. गुंतवणुकीत यश मिळू शकते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग
4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
Gokul : 4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा