AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे त्यांच्या मेंदूचा स्फोट होईल… विलिनीकरणाचा विषय निघताच संजय राऊत संतापले

संजय राऊत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर तीव्र संतापले आहेत. विलिनीकरणाच्या वारंवारच्या चर्चांमुळे लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून हटत असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ, शेतकरी आणि देशाच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी विलिनीकरणावर बोलणाऱ्यांच्या मेंदूचा स्फोट होईल, असे राऊत कडाडले. शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदींना पत्र लिहावे, असेही त्यांनी सुचवले.

अरे त्यांच्या मेंदूचा स्फोट होईल... विलिनीकरणाचा विषय निघताच संजय राऊत संतापले
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 10:41 AM
Share

राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून जोरदार चर्चा सुरू आहे. विलिनीकरण होणार की नाही? अशी चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता राऊत प्रचंड संतापले. अरे जे लोक विलिनीकरणाची चर्चा करत आहेत. त्यावर वारंवार बोलत आहेत. त्यांच्या मेंदूचा स्फोट होईल. काय आहे विलिनीकरण? विलिनीकरण? विलिनीकरणाने देश चालतो का? शरद पवारही तुमच्या चर्चांचा आनंद घेत आहेत, असा संतापच संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना व्यक्त केला.

दोन राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं काय आणि नाही झालं काय? काय फरकत पडतो? विलिनीकरणाने देश चालतो का? देशापुढे अनेक समस्या आहेत. लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. दुष्काळ पडलाय. शेतकरी हवालदिल आहे. तुमचं काय विलिनीकरण, विलिनीकरण चाललंय? अरे एक दिवस चर्चा करणाऱ्यांच्या मेंदूचा स्फोट होईल. या मर्जर प्रकरणाने लोकं वेडे होतील. बस झालं आता. एवढं रवंथ गायी आणि म्हशीही करत नाहीत. शरद पवारही विलिनीकरणाचा आनंद घेत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

पवारांनी मोदींना पत्र लिहावं

शरद पवारांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम लक्ष असतं. कालच्या मोर्चाची ते दखल घेणारच. त्यांना बरं वाटलं तर ते कोल्हापुरात जाऊन भेटतील. पंतप्रधान मोदींनी पवारांना फोन केला होता. देशाचे प्रश्न आपण दोघे सोडवू, असं मोदी म्हणाले होते. मला वाटतं आता, पवारांनी त्यांना ताबडतोब पत्र लिहिलं पाहिजे आधी गोकुळचा प्रश्न सोडवा म्हणून सांगितलं पाहिजे. तुमच्या लोकांनी दरोडा टाकला आहे. लोकशाहीच्या विरोधात तुमचे लोक जात आहेत. त्यामुळे तुम्ही गोकुळचा प्रश्न सोडवा, असं पवारांनी मोदींना म्हटलं पाहिजे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

सरनाईक बेसनचा लाडू खाऊन जातील

राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक हे संजय राऊत यांच्या घरी आले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी खाली आल्यावर बघितलं कोण आलं? त्यांचे आणि माझ्या आईचे वर्षानुवर्षे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सरनाईक दिवाळीला येत असतात. यातून काही राजकीय काही संकेत नाही. ते येतील बेसनचा लाडू खातील. त्यांना बेसनचा लाडू खूप आवडतो. चकली खातील. आईचा आशीर्वाद घेऊन जातील, असं राऊत म्हणाले.

शिंदे गटात दोन शिंदे गट

दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. शिंदे गटात दोन गट आहे. शिंदे गटात दोन शिंदे आहेत. तुम्हीच शोधा, असं त्यांनी म्हटलंय.

अजितदादांचं कुणालाच पडलं नाही

अजित पवार यांच्या अपघातात सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबद्दल कोणी गंभीर नाही. अजितदादांचं कुटुंबही गंभीर नाही. राज्य सरकारही नाही. एक नेता आरोप करत आहे. त्यांचा मुलगा गृहराज्य मंत्री आहे. गृहराज्य मंत्र्याचा बाप बोलत आहेत. त्याची दखल घेतली पाहिजे. त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर चौकशी केली पाहिजे, असं ते म्हणाले.

Follow Us
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग
4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
Gokul : 4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...