AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 20 वर्षांनंतर गुन्हा सिद्ध! लोकप्रिय कॉमेडियनला बलात्कार, लैंगिक शोषण प्रकरणी 10 वर्षांचा कारावास

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. आता देखील तब्बल 20 वर्षांनंतर लोकप्रिय कॉमेडियनवर असलेले बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध झाले आहेत... तर त्याला कोर्टाने तब्बल 10 पेक्षा जास्त वर्षांची शिक्षा देखील सुनावली आहे.

तब्बल 20 वर्षांनंतर गुन्हा सिद्ध! लोकप्रिय कॉमेडियनला बलात्कार, लैंगिक शोषण प्रकरणी 10 वर्षांचा कारावास
Russell Brand
| Updated on: Nov 10, 2026 | 10:14 AM
Share

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. 51 वर्षीय लोकप्रिय कॉमेडियनला तब्बल 10 पेक्षा अधिक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 20 वर्षानंतर कॉमेडिनवर असलेले आरोप सिद्ध झाले आहे. कॉमेडियनव बलात्कार आणि लैंगिक शोषण यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सध्या ज्या कॉमेडियनची चर्चा सुरु आहे, त्या कॉमेडियनचं नाव रसेल ब्राँड आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लंडनमधील साउदवार्क क्राउन कोर्टात आपला निकाल देताना, न्यायाधीश जोएल बेनाथन यांनी रसेल ब्रँडचे वर्णन एक प्रिडेटर असं केले. त्यांनी पुढे असंही नमूद केलं की, ब्रँडने पीडितांप्रति अत्यंत उद्धटपणा आणि तिरस्कार दर्शवला होता.

सांगायचं झालं तर, गेल्या आठवड्यातच न्यायालयाने त्याला 2004 ते 2009 या काळात चार वेगवेगळ्या महिलांवरील बलात्काराच्या एका प्रकरणात आणि लैंगिक अत्याचाराच्या तीन प्रकरणांत दोषी ठरवलं होतं. शिक्षा सुनावली जात असताना रसेल ब्रँडच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते.

रसेल ब्रँडच्या वकिलांनी काय म्हटले?

रसेल ब्रँडचे वकील इयान विंटर यांनी युक्तिवाद केला की, रसेल आता पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा माणूस बनला आहे. पूर्वी त्याला दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन होतं आणि त्यातून बाहेर पडल्याबद्दल तो उघडपणे बोलला आहे. दरम्यान, सुनावणीदरम्यान वकिलाने पीडितेचा जबाबही वाचून दाखवला आणि सांगितलं की, या घटनेनंतर ती आजही त्या धक्क्याने थरथर कापते. जे घडलं ते तिला एखाद्या वाईट स्वप्नासारखे वाटतं, जे कधीही संपत नाही.

अजूनही दोन आरोपांचा तपास सुरू आहे

एवढंच नाही तर, मिळालेल्या माहितीनुसार लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं की, इतर दोन कथित बलात्काराच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात असं सांगितलं जात आहे की, घटनेच्या वेळी पीडित मुलगी 16 वर्षांची होती. पोलिसांनी सांगितले की, भविष्यात आणखी पीडित पुढे आल्यास यात नवल वाटण्यासारखं काही नाही. रसेल ब्रँडच्या प्रोफेशनल) आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तो ‘फॉरगेटिंग सारा मार्शल’, ‘गेट हिम टू द ग्रीक’ आणि ‘आर्थर’ सारख्या सिनेमांमध्ये झळकला आहे.

Follow Us
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग
4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
Gokul : 4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...