AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha: यालाच मॅटर्निटी फोटोशूट समजा.. बेबी बंप दाखवत समंथाची हटके पोस्ट

समंथा आणि राज यांच्या आयुष्यात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. हे समंथाचे पहिलं बाळ असल्याने चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. डिसेंबर 2026 मध्ये ती बाळाला जन्म देण्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे. मात्र, अभिनेत्रीने प्रसूतीची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही.

Samantha: यालाच मॅटर्निटी फोटोशूट समजा.. बेबी बंप दाखवत समंथाची हटके पोस्ट
Samantha Ruth PrabhuImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2026 | 10:03 AM
Share

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. आई होण्याचा आनंद अनुभवत असलेल्या समंथाने नुकताच सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, यासाठी तिने कोणताही भव्य सेट, महागडे कपडे किंवा ग्लॅमरस मेकअपचा आधार घेतलेला नाही. अगदी साध्या आणि बिनधास्त अंदाजात तिने आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. तिच्या या हटके मॅटर्निटी फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांनी तर तिला ‘कूलेस्ट मॉमी टू बी’ म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

समंथाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सोफ्यावर अगदी आरामात बसलेली दिसत आहे. तिने लाल रंगाचा प्रिंटेड टॉप, पांढरी पँट आणि डोळ्यांवर काळा गॉगल घातला आहे. या फोटोमध्ये समंथाचा बेबी बंपसुद्धा पहायला मिळतोय. दोन्ही हातांनी बेबी बंपला आधार देत तिने एकदम कॅज्युअल अंदाजात पोझ दिली आहे.

पहा फोटो-

या फोटोला तिने ‘Consider this my maternity shoot’ म्हणजेच ‘हेच माझं मॅटर्निटी फोटोशूट समजा’ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. सेलिब्रिटींच्या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये अनेकदा आकर्षक कपडे, भव्य सजावट आणि खास थीम पाहायला मिळते. मात्र, समंथाने या सगळ्यापेक्षा वेगळा मार्ग निवडत साधेपणातूनच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समंथाची ही पोस्ट व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका चाहत्याने ‘The Coolest mommy-to-be ever!’ अशी कमेंट करत तिच्या अंदाजाचं कौतुक केलं. तर दुसऱ्या चाहत्याने ‘प्लॉट ट्विस्ट : बाळाने आतापासूनच सगळी लाइमलाइट चोरली आहे’, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. काहींनी ‘बेस्ट मॅटर्निटी फोटोशूट’ असं म्हटलं, तर अनेकांनी समंथाला सुखरूप प्रसूतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

समंथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी कोइम्बतूरमधील ईशा योग सेंटर इथं जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विवाह केला होता. त्यानंतर जून 2026 मध्ये ‘मा इंटी बंगाराम’ या चित्रपटाच्या सक्सेस इव्हेंटदरम्यान समंथाने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

आई होण्याच्या नव्या प्रवासासाठी समंथा काही काळ अभिनयापासून दूर राहणार आहे. ‘मा इंटी बंगाराम’ चित्रपटाची उर्वरित कामं पूर्ण केल्यानंतर ती मॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचं तिने सांगितलं आहे. हा ब्रेक तात्पुरता असून मातृत्वाचा आनंद घेतल्यानंतर ती पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, तिच्या या हटके फोटोशूटमुळे पुन्हा एकदा समंथा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Follow Us
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग
4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
Gokul : 4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...