AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी समोर येताच PM मोदी दुसरीकडे पाहतात; सोनिया गांधींचं वक्तव्य चर्चेत

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केलं. तसेच काही ठिकाणी त्यांचं कौतुक केलं. तर काही ठिकाणी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका देखील केली.

मी समोर येताच PM मोदी दुसरीकडे पाहतात; सोनिया गांधींचं वक्तव्य चर्चेत
sonia gandhi news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 9:40 AM
Share

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. या पुस्तकात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही भाष्य केलं. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी फार कमी संपर्क राहिलाय. मी समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरीकडे पाहतात, असे विधान सोनिया गांधी यांनी केलं. त्याचवेळी सोनिया गांधी यांनी पुस्तकात मोदींचं कौतुकही केलं आहे. तर काही ठिकाणी त्यांनी प्रखर शब्दात टीका देखील केली आहे. याचबरोबर सोनिया गांधी यांनी आणीबाणीच्या काळाचा देखील उल्लेख केला आहे.

सोनिया गांधी यांनी म्हटलं की,  ते त्यांच्या भारताच्या संकल्पनेसाठी लढत होते. तर दुसरीकडे मी माझ्या संकल्पनेसाठी लढत होते. वर्चस्वाच्या विरोधात, सर्वसमावेशक,  धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्याय असा संकल्पनेचा भारत माझ्या मनात आहे. यात वैयक्तिक काहीही नव्हतं’.  सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठं भाष्य केलं. सोनिया गांधी यांनी म्हटलं की, आज त्यांच्याशी माझा फारसा संपर्क नाही. ते अधूनमधून अध्यक्षांच्या दालनातील कार्यक्रमात भेटतात. ते कधी माझ्यासमोर समोर येतात. तेव्ही मी त्यांना नमस्कार करते.  आधीच्या काळात वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटायचे. परंतु आता नेते दुसरीकडे पाहतात, जेणेकरून नजर पडू नये’ .

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, ‘ मला आमच्या काळातील सत्ताधारी वर्गाची अस्वस्थता समजू लागलीये. दिल्लीत एखाद्या बैठकीतील राजकीय चर्चा अनेकदा अस्वस्थ करणाऱ्या वाटायच्या. तेव्हा मला तिथे व्यक्त होणारी मते भारताच्या खऱ्या वास्तव्यापासून दूर असल्यासारखी वाटायची’. तर नरेंद्र मोदींवर म्हणाल्या की, ‘नरेंद्र मोदी हे सामान्य पार्श्वभूमीतून वर आले. ते पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील दिग्गज नेते देखील झाले’. दरम्यान, पीटीआयने ‘द गार्डियन’चा संदर्भ देत सोनिया गांधींच्या पुस्तकाविषयी एक वृत्त दिलं. या वृत्तानुसर, त्यांच्या पुस्तकात सोनिया गांधी म्हणाल्या की,  त्यांनी लोकांवर आणीबाणी लादण्याचा निर्णय चूक असल्याचे मान्य केलं. या निर्णयानंतरच्या परिस्थितीनंतर माझ्या सासू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही तसं वाटलं असावं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग
4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
Gokul : 4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...