राज्यात मोठ्या घडामोडी! मंत्री प्रताप सरनाईक संजय राऊतांच्या भेटीला, कारण काय?
ऐन दिवाळी राजकीय घडामोडींचे फटाके फुटू लागलेत. ऐन दिवाळीत मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या भेटीला पोहोचल्याचे समोर आलं आहे.

ऐन दिवाळी राजकीय घडामोडींचे फटाके फुटू लागले आहेत. शिवसेना फुटीनंतर दुरावलेले नेते पुन्हा भेटू लागल्याचे दिसत आहे. शिंदे गटातील मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या भेटीला पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीने अनेकांच्या भुवया उंचवाल्या. ऐन दिवाळीत घेतलेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा दुरावा निर्माण झालाय. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर कठोर शब्दात आगपाखड केली जात आहे. निवडणुकीच्या मैदानातही दोन्ही गट एकमेकांच्या उभे ठाकले होते. तर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून एकमेकांवर जोरदार टीका होते. त्यानंतरही दोन्ही गटाच्या नेत्यांची आज दिवाळीनिमित्त भेट झाली. या भेटीवर संजय राऊत म्हणाले, मी घराच्या खाली आल्यावर प्रताप सरनाईक आल्याचे कळाले. मी भेटायला जाईल. आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांची आई आणि माझ्या आईचे फार वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दिवाळीचा सण आहे,तर ते येणारच. यामागे कोणतेही संकेत नाहीत. ते येतील लाडू, चकली खातील. त्यांना आवडतो. आईचा आशीर्वाद घेऊन निघून जातील. त्यापलीकडे काही नाही. शिवसेना विलीनीकरणाचं काही नाही. शिंदे गटात दोन शिंदे आहेत. तो तुम्ही शोधा’.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
