Bhaubeej Gift Idea: भाऊबीजेला बहिणीला काय द्यावं सुचत नाहीये? या खास गिफ्ट आयडियांनी जिंका तिचं मन
Gift For Sister: भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहिणीला ओवाळणीसोबत एखादी खास भेटवस्तू द्यायची असेल, तर या गिफ्ट आयडिया नक्की पाहा. तुमच्या बहिणीच्या आवडीनुसार निवडा खास भेट.

दिवाळीच्या सणातील भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊही बहिणीला ओवाळणी देऊन तिच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करतो. अनेक भाऊ आपल्या बहिणीला तिच्या आवडीची आणि उपयोगी पडेल असे गिफ्ट देण्याचा विचार करतात. तुम्हालाही यंदा भाऊबीजेला बहिणीला काहीतरी खास देऊन सरप्राइज करायचे असेल, तर महागड्या भेटवस्तूंची गरज नाही. तिच्या आवडीनुसार निवडलेली छोटीशी भेटही तिच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते. चला तर मग, पाहूया बहिणीसाठी खास गिफ्ट आयडिया
बहिणीला काहीतरी हटके आणि फॅशनेबल भेट द्यायची असेल, तर तिला ट्रेंडी ज्वेलरी देऊ शकता. सध्या लेयर्ड नेकलेस, स्टेटमेंट इअररिंग्स, चंकी रिंग्स, कफ ब्रेसलेट आणि मिनिमलिस्ट ज्वेलरी चांगलीच ट्रेंडमध्ये आहे. तिच्या वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न लूकला शोभतील असे स्टायलिश प्रकार निवडा.
स्किन केअर आणि ब्युटी हॅम्पर
बहिणीला स्किन केअर आणि मेकअपची आवड असेल, तर तिच्यासाठी खास ब्युटी हॅम्पर तयार करा. यामध्ये फेसवॉश, मॉइश्चरायझर, लिप बाम, सनस्क्रीन, शीट मास्क किंवा तिच्या आवडीची लिपस्टिक, आयशॅडो पॅलेटे ठेवू शकता. तिच्या आवडीनुसार वस्तू निवडून हा हॅम्पर अधिक खास बनवता येईल.
हँडबॅग किंवा स्लिंग बॅग
बहिणीला रोजच्या वापरासाठी उपयोगी पडेल अशी हँडबॅग भेट देऊ शकता. ऑफिसला जाणाऱ्या बहिणीसाठी टोट बॅग किंवा क्लासी हँडबॅग, तर कॉलेजला जाणाऱ्या बहिणीसाठी स्लिंग बॅग किंवा बॅकपॅक चांगला पर्याय ठरू शकतो. तिच्या आवडीचा रंग आणि डिझाइन निवडायला विसरू नका.
खास आठवणींची फोटो फ्रेम किंवा पर्सनलाइज्ड गिफ्ट
काही भेटवस्तूंची किंमत पैशांपेक्षा त्यामागील भावनेमुळे जास्त असते. अशावेळी तुम्ही दोघांच्या बालपणीच्या आठवणींचा फोटो फ्रेममध्ये समावेश करू शकता. याशिवाय नाव लिहिलेला मग, पर्सनलाइज्ड जर्नल किंवा खास संदेश असलेली भेटवस्तूही देऊ शकता. अशी भेट बहिणीसाठी कायमस्वरूपी आठवण ठरू शकते.
हेडफोन, ईअरबड्स किंवा स्मार्टवॉच
बहिणीला गाणी ऐकण्याची, गेमिंगची किंवा टेक्नॉलॉजीची आवड असेल, तर तिला चांगल्या दर्जाचे हेडफोन किंवा वायरलेस ईअरबड्स भेट देऊ शकता. तसेच तिच्या रोजच्या वापरासाठी स्मार्टवॉच किंवा आकर्षक डिझाइनचे घड्याळही निवडू शकता. ही भेट दिसायला छान असण्यासोबतच उपयोगीही ठरेल.
इन्स्टंट कॅमेरा
बहिणीला फोटो काढण्याची आणि आठवणी जपण्याची आवड असेल, तर तिला इन्स्टंट कॅमेरा भेट देऊ शकता. या कॅमेऱ्याने फोटो काढल्यानंतर काही क्षणांतच त्याची प्रिंट मिळते. त्यामुळे खास क्षणांचे फोटो लगेच जपून ठेवता येतात. ट्रॅव्हल, पार्टी किंवा मित्र-मैत्रिणीं सोबतच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ही एक हटके भेट ठरू शकते.
