AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही संधी अजिबात सोडू नका! Samsung चा फोल्डेबल फोन तब्बल 56 हजार रुपयांनी स्वस्त

Samsung Galaxy Z Fold 7 वर Amazon च्या दिवाळी सेलमध्ये तब्बल 56 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. 200MP कॅमेरा, Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि फोल्डेबल डिस्प्ले असलेल्या या फोनवर बँक ऑफरचाही लाभ घेता येणार आहे.

ही संधी अजिबात सोडू नका! Samsung चा फोल्डेबल फोन तब्बल 56 हजार रुपयांनी स्वस्त
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 2:30 PM
Share

दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Samsung चा फोल्डेबल फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Samsung Galaxy Z Fold 7 या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. आता हा फोन तब्बल 56 हजार रुपयांपर्यंत कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही, तर फोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंटचाही लाभ मिळत आहे. 200MP कॅमेरा, मोठी फोल्डेबल स्क्रीन आणि Google Gemini सारखे AI फीचर्स हे या फोनचे वैशिष्ट्य आहेत. Amazon च्या दिवाळी सेलमध्ये या प्रीमियम स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफरबद्दल जाणून घेऊया.

Samsung Galaxy Z Fold 7 वर मिळतेय इतकी मोठी सूट

Samsung Galaxy Z Fold 7 हा स्मार्टफोन Amazon वर 1,28,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. या फोनची मूळ MRP 1,84,999 रुपये आहे. म्हणजेच फोनच्या किमतीत थेट 56 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. याशिवाय, बँक ऑफर अंतर्गत खरेदी केल्यास 3,689 रुपयांची अतिरिक्त सूटही मिळू शकते.

हा फोल्डेबल स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB असे पर्याय मिळतात. ग्राहकांना हा फोन ब्लू शॅडो, जेट ब्लॅक आणि कोरल रेड या तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल.

Samsung Galaxy Z Fold 7 चे फीचर्स

Samsung च्या या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची फोल्ड होणारी स्क्रीन. यामध्ये 8 इंचांचा 2X Dynamic AMOLED मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2,600 निट्सपर्यंत आहे. फोनच्या बाहेरील बाजूला 6.5 इंचांचा 2X Dynamic AMOLED कव्हर डिस्प्लेही देण्यात आला आहे. त्यामुळे फोन न उघडताही सहज वापरता येतो.

डिझाइनबद्दल सांगायचे झाल्यास, फोन फोल्ड केल्यानंतर त्याची जाडी 8.9mm, तर उघडल्यानंतर 4.2mm इतकी असते. या फोनचे वजन 215 ग्रॅम आहे. दमदार परफॉर्मन्ससाठी यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट मिळतो.

या स्मार्टफोनमध्ये 4,400mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या पुढील आणि मागील बाजूला Corning Gorilla Ceramic 2 चे संरक्षण देण्यात आले आहे.

200MP कॅमेऱ्यासह ट्रिपल कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी Galaxy Z Fold 7 च्या मागील बाजूला तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 200MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेऱ्याचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये दोन 10MP कॅमेरे देण्यात आले आहेत. यापैकी एक कॅमेरा मुख्य डिस्प्लेवर, तर दुसरा कव्हर डिस्प्लेवर देण्यात आला आहे. सॉफ्टवेअरबद्दल सांगायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Android 16 वर आधारित One UI ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो.

Follow Us
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...