जेव्हा आपण रिकाम्या खोलीत बोलतो, तेव्हा आपल्या आवाजाच्या ध्वनीलहरी भिंती, छत आणि जमिनीवर आदळून पुन्हा परत येतात. त्यामुळे आवाज घुमल्यासारखा जाणवतो.
1 / 5
घरात सोफा, पडदे, गालिचे, उशा यांसारख्या वस्तू आवाज शोषून घेतात. मात्र, रिकाम्या खोलीत अशा वस्तू नसल्यामुळे ध्वनीलहरींचे परावर्तन जास्त होते.
2 / 5
आवाज ऐकल्यानंतर तो किमान ०.१ सेकंदांनी पुन्हा ऐकू आला, तर त्याला प्रतिध्वनी (Echo) म्हणतात. मात्र, लहान रिकाम्या खोल्यांमध्ये आवाज लगेच परत येत असल्यामुळे निनाद (Reverberation) निर्माण होतो.
3 / 5
भिंतींवरून परत येणाऱ्या ध्वनीलहरी मूळ आवाजात मिसळतात. काही लहरी एकमेकांना बळ देतात, त्यामुळे आवाज अधिक मोठा, घुमणारा किंवा वेगळा ऐकू येतो.
4 / 5
खोलीत सोफा, खुर्च्या, पडदे आणि गालिचे ठेवल्यामुळे ध्वनीलहरी शोषल्या जातात आणि त्यांचे परावर्तन कमी होते. त्यामुळे आवाजाचा घुमणारा प्रभाव कमी होऊन खोलीतील आवाज नैसर्गिक वाटू लागतो.