AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Saraf : ड्रायव्हर ओव्हरटेक करायला गेला अन्…मृत्यूच्या दाढेतून परतलेले अशोक सराफ, सहा महिने होते रुग्णायालात; सांगितला धक्कादायक प्रसंग

Ashok Saraf On His Accident : सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी नुकत्याच एका मुलाखतीत अपघाताचा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. या अपघातानंतर अशोक मामा सहा महिने रुग्णालयात होते.

Ashok Saraf : ड्रायव्हर ओव्हरटेक करायला गेला अन्...मृत्यूच्या दाढेतून परतलेले अशोक सराफ, सहा महिने होते रुग्णायालात; सांगितला धक्कादायक प्रसंग
| Updated on: Nov 07, 2026 | 2:07 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षांपासून अधिराज्य गाजवलं आहे. विनोदी भूमिकांपासून ते गंभीर भूमिकांपर्यंत प्रत्येक भूमिका त्यांनी उत्तमरीत्या साकारली. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला होता, ज्यामध्ये त्यांना मृत्यूच्या दाढेतून परत यावं लागलं. १९८७ मध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या अपघाताचा थरारक अनुभव सांगितला आहे.

अशोक सराफ यांनी सांगितला धक्कादायक प्रसंग

अशोक सराफ यांनी ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत 1987 मधील या घटनेची आठवण सांगितली. त्यावेळी ते मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग करत होते. दुसऱ्याच दिवशी त्यांचं कोल्हापूरमध्ये शूटिंग नियोजित होतं. अशोक सराफ म्हणाले की, ‘ही गोष्ट 1987 ची आहे. मी तेव्हा मुंबईत मेहबूब स्टुडिओमध्ये एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग करत होतो. त्याच्या दुसऱ्यादिवशी माझं कोल्हापूरला शूटिंग होतं. पण, तेव्हा हिंदी सिनेमाच्या निर्मात्यानं संपूर्ण सेट वगैरे लावला होता. तो मला म्हणाला, हा सगळा सेट लावलाय…तुम्ही प्लीज परवा कोल्हापुरला जा. उद्या इथे शूटिंग करा. माझं कोल्हापुरात जायचं तिकीट वगैरे सगळं होतं मग, शेवटी तो निर्माता म्हणाला, मी माझी गाडी देतो तुम्हाला. कारण, तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. आता माझ्या एका सीनसाठी त्याला पूर्ण सेट पुन्हा लावायला सांगणं चुकीचं होतं. म्हणून, मी सुद्धा तयार झालो. रेल्वे तिकीट कॅन्सल केलं आणि कार घेऊन निघालो. त्याआधी मी पूर्ण दिवस शूटिंग केलं आणि रात्री कार घेऊन जात होतो.

‘त्याने मला ड्रायव्हर दिला होता. त्यामुळे ठाणे येईपर्यंत मी झोपलो आणि थेट उठलो तीन दिवसांनी. अपघात झाला खेड-शिवापूर मार्गावर. तेव्हा ड्रायव्हरचाही डोळा लागला असावा कारण, रात्री १० वाजता मुंबईतून निघून, मी सकाळी ८ वाजता खेड-शिवापूरला होतो आणि तिथेच अपघात झाला होता. खेड-शिवापूरच्या रस्त्यावर ड्रायव्हर ओव्हरटेक करायला गेला आणि त्याचा अंदाज चुकला आणि समोरून आला ट्रक. समोरासमोर गाड्यांची जोरदार धडक झाली. मला तेव्हाचं काहीही माहिती नाही, आठवत नाही कारण मी झोपलो होतो, तेव्हाच ही घटना घडली. आता गाडीत आपण बसून असतो, त्यामुळे माझ्या पाठीला, मणक्याला क्रॅक गेला. त्या गाडीतून मी कसा बाहेर पडलो, ते सुद्धा मला आठवत नाहीये. मी कसा त्यातून वाचलो काय माहिती. तो चमत्कार होता. मला तेव्हा येणाऱ्या-जाणाऱ्या कुणीच ओळखलं नव्हतं. कारण, अपघातच इतका भयंकर झाला होता, गाडीची अवस्थाही अगदी बिकट झाली होती. पण, अचानक एका बंगाली माणसानं मला ओळखलं. त्यानं मला उचलून एसटीमध्ये ठेवलं.’

‘मग एसटीच्या शेवटच्या सीटवर मला झोपवलं आणि ससूणमध्ये नेलं. तिथे मला वेळेत मदत मिळत नव्हती, एक पंजाबी मुलगी होती तिने मला ओळखलं आणि पुणे गेस्टहाऊसला फोन केला, त्यानंतर मग सगळे धावत आले. अजय सरपोतदारने तेव्हा मला ससूण रुग्णालयातून उचललं आणि दुसऱ्या एका रुग्णालयात दाखल केलं. तिथे मात्र, माझी बरीच काळजी घेतली. त्यांनी मला खूप चांगली ट्रिटमेंट दिली. तेव्हा माझं ऑपरेशन झालं आणि मी सहा महिने रुग्णालयात होतो. त्यानंतर थेट सहा महिन्यांनी मी कामाला सुरुवात केली. सगळाच चमत्कार होता. यावर आजच्या काळात कुणी विश्वास ठेवणार नाही. कारण, मी गाडीतून कसा बाहेर पडलो हेच मला माहिती नाहीये. खूप मोठा चमत्कार होता.’ असं अशोक सराफ यांनी शेवटी सांगितलं.

Follow Us
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता