भारतात वाढणार कॅन्सरचा धोका, 2050 सालापर्यंत…लोकांमध्ये भीतीचं वातावरण
भारतात कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. 2050 सालापर्यंत कॅन्सरचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

cancer Image Credit source: टीव्ही9 मराठी
- भारतात कॅन्सरचा धोका वाढू लागला आहे. देशात कॅन्सरच्या रुग्णात मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे.
- भारतात कॅन्सरचे 14.13 लाख नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत भारतात कॅन्सरने 9.16 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
- देशात प्रत्येक 10 पैकी एका भारतीय व्यक्तीला 75 वर्षांच्या आधी कॅन्सर होण्याची भीती असते. भारतात 2024 साली जवळपास 16 लाख नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 2050 सालापर्यंत कॅन्सरच्या रुग्णांची संख्या 28 लाखांपर्यंत पोहोचण्याची भीती आहे.
- भारतात 30 ते 40 वर्षांच्या व्यक्तींना कॅन्सर होऊ लागला आहे. तंबाखूचं सेवन, अयोग्य आहार, कमी शारीरिक हालचाली, प्रदुषण यांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
- कॅन्सरचे रुग्ण आता गावाखेड्यातही आढळून येत आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अनेकांना आर्थिक खर्च अडचणीचा सामना करावा लागतो.
Follow Us





