AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, मातृभूमि चित्रपट फक्त 11 रुपयांमध्ये पाहता येणार, सलमानचा मोठा निर्णय

चित्रपट रिलीज होण्याआधीच सलमान खानचा मोठा निर्णय. मातृभूमि चित्रपट फक्त 11 रुपयांमध्ये पाहता येणार. कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

सलमानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, मातृभूमि चित्रपट फक्त 11 रुपयांमध्ये पाहता येणार, सलमानचा मोठा निर्णय
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 06, 2026 | 7:56 PM
Share

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या आगामी ‘मातृभूमी : वॉर रेस्ट इन पीस’ या युद्धपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. बराच काळ रखडलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर मीडियासाठी लॉन्च करण्यात आला. यावेळी सलमान खानसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या कार्यक्रमात सलमानने चित्रपटाबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी खास घोषणा करून सर्वांचे लक्ष वेधले.

सलमान खानने ‘मातृभूमी’ चित्रपटासाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. ज्या प्रेक्षकांचे वय 75 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना हा चित्रपट केवळ 11 रुपयांत पाहता येणार आहे. ही सवलत फक्त 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. या घोषणेमुळे सलमानच्या चाहत्यांसह ज्येष्ठ प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटावर उपस्थित झालेल्या प्रश्नांना सलमानचे उत्तर

‘मातृभूमी’च्या कथेमध्ये बदल करण्यासाठी सरकारकडून दबाव टाकण्यात आल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर सलमानने स्पष्टीकरण दिले. चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यासाठी सरकारकडून कोणताही दबाव नव्हता, असे त्याने स्पष्ट केले. या चर्चा खोट्या असल्याचेही सलमान म्हणाला.

हा चित्रपट लष्करी अधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संघर्षमय आयुष्य दाखवतो. कठीण परिस्थितीतही देशाला प्राधान्य देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची कथा यात मांडण्यात आली आहे.

VFX मुळे चित्रपटाच्या रिलीजला उशीर

सलमानने चित्रपटाच्या प्रदर्शनाला झालेल्या विलंबाचे कारणही सांगितले. चित्रपटातील VFX अर्थात व्हिज्युअल इफेक्ट्सच्या कामामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आली होती. सध्या उर्वरित VFX चे काम सुरू असून, चित्रपट 4 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर सोशल मीडियावर काही दिवसांनंतर प्रदर्शित केला जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

श्रद्धा कपूरच्या चित्रपटाशी होणार टक्कर

‘मातृभूमी’मध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे. विशेष म्हणजे, 4 डिसेंबर रोजी श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळू शकते.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?