AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Gandhi Autobiography: काँग्रेस वारंवार का हारतेय? सोनिया गांधींनी आत्मचरित्रात परखडपणे मांडलं, नेमकं काय लिहिलंय?

आत्मचरित्रात सोनिया गांधी यांनी काँग्रेसमधील अंतर्गत बाबींसह देशाच्या राजकारणावरील घडामोडींवर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी इंदिरा गांधींची हत्या ते आणीबाणी अशा अनेक घटनांवर परखड मत मांडले आहे.

Sonia Gandhi Autobiography: काँग्रेस वारंवार का हारतेय? सोनिया गांधींनी आत्मचरित्रात परखडपणे मांडलं, नेमकं काय लिहिलंय?
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 7:27 PM
Share

Sonia Gandhi Autobiography News:  राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ नेत्या यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राचे आज प्रकाशन झाले. या आत्मचरित्रात सोनिया गांधी यांनी काँग्रेसमधील अंतर्गत बाबींसह देशाच्या राजकारणावरील घडामोडींवर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी इंदिरा गांधींची हत्या ते आणीबाणी अशा अनेक घटनांवर परखड मत मांडले आहे. याच पुस्तकात सोनिया गांधी यांनी आता काँग्रेसची झालेली पिछेहाट, काँग्रेसचा वारंवार पराभव का झाला? याबाबत सर्वात महत्त्वाचा खुलासा केला आहे.

2019च्या पराभवाचे एकच कारण….!

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवामागे पुलवामा हल्ला हे मुख्य कारण होते, अस मत सोनिया गांधी यांनी मांडले आहे. या पुस्तकात त्या लिहतात की, पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट हवाई हल्ल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या राजकीय वातावरणावर प्रभाव टाकला. असे असूनही, राहुल गांधींनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

2014 च्या पराभवाबद्दल सोनिया काय म्हणाल्या?

एका मुलाखतीत, सोनिया 2014 च्या पराभवाबद्दल म्हणाल्या की, सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. शिवाय भाजपच्या उत्कृष्ट निवडणूक मॅनेजमेंटमुळे काँग्रेसचा पराभव झाला. त्यांनी 2014 च्या पराभवासाठी सत्ताविरोधी लाटेलाही जबाबदार धरले. आपल्या आत्मचरित्रात, सोनिया गांधी यांनी 2014 च्या निवडणुकीच्या वातावरणासाठी अण्णा आंदोलनालाही जबाबदार धरले आहे. सोनियांच्या मते, अण्णा आंदोलनाची पटकथा भाजप आणि आरएसएसच्या सदस्यांनी लिहिली होती.अण्णा आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचा प्रचार करण्यात आला. सोनिया गांधींच्या मते, अण्णा हजारे यांची मुख्य मागणी लोकपाल होती, जी लागू करण्यात आली, परंतु काँग्रेसला त्याचा फायदा झाला नाही. प्रचारात काँग्रेस मागे पडली.

2004 मध्ये होती अस्तित्वाची लढाई

2004 मधील विजयावर सोनिया गांधी त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, “जेव्हा मी राजकारणात आले, तेव्हा माझी फक्त दोन उद्दिष्ट्ये होती. पहिले, इंदिरा आणि राजीव गांधी यांचे कार्य पुढे नेणे आणि दुसरे, काँग्रेस पक्षाला मुख्य प्रवाहातील राजकारणात टिकवून ठेवणे. सोनियांच्या मते, त्यावेळी भाजप मजबूत होत होता, म्हणून मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. सोनिया गांधी पुढे लिहितात, “2004 ची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई होती. या काळात मी दोन खबरदारी घेतली. पहिले, मी पक्ष आणि आघाडी एकसंध ठेवली. दुसरे, पंतप्रधान कोण होईल याचा अंदाज मी कोणालाही लावू दिला नाही. निवडणुकीनंतर, सोनिया गांधींनी यूपीए पक्षांच्या संमतीने मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केले. सोनियांच्या मते, मनमोहन एक प्रामाणिक नेते म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्याकडे सरकार चालवण्याचा अनुभव होता.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?