AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 18 सिरीजचा सर्वात स्वस्त मोबाईल येणार, iPhone 17 हून असणार वेगळा

Apple कंपनी आता मोठी तयारी करत आहे. येत्या काही दिवसात कंपनी iPhone 18 स्टँडर्ड, iPhone Air 2 आणि iPhone 18e ला लाँच करणार आहे. तसेच iPhone 18e या लाईनअपचा सर्वात स्वस्त हँडसेट असेल. चला तर या संदर्भातील डिटेल्स पाहूयात...

iPhone 18 सिरीजचा सर्वात स्वस्त मोबाईल येणार, iPhone 17 हून असणार वेगळा
iPhone 18 - affordable mobile
| Updated on: Nov 08, 2026 | 4:58 PM
Share

Apple कंपनीने अलिकडेच iPhone 18 Pro मालिका आणि iPhone Duo ला लाँच केले आहे. अनेक लोक iPhone 18 ची वाट पाहात होते.परंतू कंपनी त्याला लाँच केले नाही. आता नव्या बातम्यानुसार Apple कंपनी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला iPhone 18 आणि iPhone 18e आणि iPhone Air 2 ला लाँच करणार आहे.

iPhone 18 Pro सिरीजच्या तुलनेत स्टँडर्ड iPhone 18 ला खूपच स्वस्तात लाँच केले जाणार आहे. तसेच कंपनी iPhone 18e ला देखील लाँच करणार असून तो या लाईनअपचा सर्वात स्वस्त आयफोन असेल. मात्र, कंपनी अद्यापपर्यंत अपकमिंग आयफोनच्या किंमती संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

iPhone Air 2 संदर्भात अलिकडेच अनेक माहिती बाहेर आली आहे. आता नव्या माहितीनुसार iPhone Air 2 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

iPhone 18 च्यामध्ये दोन मोठे अपग्रेड्स पाहायला मिळतील

जीएसएमअरेना यांनी आपल्या बातमीत म्हटले आहे की iPhone 18 मध्ये दोन मोठे अपग्रेड्स पाहायला मिळणार आहे. पहिला अपडेट्स म्हणजे iPhone 18 मध्ये मोठा बॅटरी पॅकचा वापर केलेला आहे. या शिवाय दुसरा अपडेट्स हा आहे की कंपनी आता न्यू चिपसेटचा वापर करणार आहे, जो पॉवर एफिसिएंट असेल.

A20 चिपसेटचा वापर

iPhone 18 मध्ये 2nm प्रोसेसिंगवर तयार केलेल्या A20 चिपसेटचा वापर केला जाईल. याच्या मदतीने iPhone यूजर्सना बेहदर परफॉर्मेंस आणि शानदार गेमिंग एक्सपीरिएंस देखील मिळणार आहे.

iPhone 18 चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 18 संदर्भात अनेक लीक्स रिपोर्टमध्ये दावा केला आहे की या 6.3 इंचाचा LTPO OLED पॅनल देण्यात येणार आहे, जो iPhone 17 मध्ये देखील पाहायला मिळाला होता. यात 120Hz चा प्रो मोशन डिस्प्ले मिळणार आहे. ज्यात 1.5K रिझॉल्यूशन डिस्प्ले देण्यात आला आहे. iPhone 18 Pro मध्ये स्लिम बेजेल केले जाऊ शकणार आहेत.

iPhone 18 चा कॅमेरा

लीक्स रिपोर्टनुसार iPhone 18 मध्ये ड्युअल रिअर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. यात दोन्ही कॅमेरे 48-48 मेगापिक्सेलचे असू शकतात. मात्र, आतापर्यंत कंपनीने या फिचर्सना कन्फर्म केलेले नाही. 24 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमरा देखील असणार आहे.

iPhone 18 ची किंमती किती ?

iPhone 18 च्या किंमती संदर्भात रिपोर्टसमध्ये दावा केला आहे की याची किंमत भारतात 99,990 रुपये असू शकते. ही किंमत iPhone 17 च्या बरोबरीची असू शकते. आता प्रश्न हा आहे की iPhone 17 च्या किंमती कमी होणार की नाही. iPhone 18 च्या सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये 256GB इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे.

Follow Us
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर