kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावातील 126 गुंठे जमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवक सुनील वायले, त्यांच्या कुटुंबीयांसह 7 जणांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार प्रमोद विश्वनाथ गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वे क्रमांक 80 मधील जमीन व्यवहारात मयत जयंतीलाल भोईर, रतन भोईर आणि सुमन भोईर यांच्या बनावट सह्या करून खोटे खरेदीखत तयार करण्यात आले. 8 मार्च 2022 रोजी हे व्यवहार नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात निर्मला वायले, अलका वायले, किसान वायले, शिरीष दळवी, सुनील हरिचंदानी आणि जितू लालचंदानी यांचाही समावेश आहे. तक्रारदाराने धमकावल्याचाही आरोप केला आहे.
मात्र सुनील वायले यांनी सर्व आरोप फेटाळले असून हा राजकीय दबावातून दाखल केलेला गुन्हा असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.
Published on: Jun 20, 2026 06:28 PM
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा