AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंग फोनची बॅटरी लवकर संपतेय? उत्तम बॅटरी बॅकअप मिळवण्यासाठी बदला ‘या’ सेटिंग्ज

सॅमसंग फोन वापरणाऱ्यांची अनेकदा बॅटरी लवकर संपण्याबद्दल तक्रार असते. बऱ्याचदा बॅटरी लवकर संपण्याचे कारण म्हणजे फोनच्या काही विशिष्ट सेटिंग्जमुळे होते. योग्य सेटिंग्ज निवडून बॅटरीचा वापर कमी करता येतो आणि बॅटरीचे आयुष्य दुप्पट करता येते. चला या सेटिंग्जविषयी जाणून घेऊयात.

सॅमसंग फोनची बॅटरी लवकर संपतेय? उत्तम बॅटरी बॅकअप मिळवण्यासाठी बदला 'या' सेटिंग्ज
Samsung Phone SettingImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jun 20, 2026 | 11:18 PM
Share

सॅमसंग स्मार्टफोन वापरताय आणि तुमच्याही फोनची बॅटरी लवकर संपतेय तर काही महत्त्वाच्या सेटिंग्ज बॅटरी लाईफ चांगली ठेवण्यास मदत करू शकतात. कधीकधी बॅटरीची समस्या हार्डवेअरमध्ये नसून फोनच्या सेटिंग्जमध्ये असते. बॅकग्राउंड फीचर्स, जास्त ब्राइटनेस आणि सतत चालू असलेल्या सर्व्हिसेसमुळे बॅटरीचा वापर वाढू शकतो. अशावेळेस काही सोपे बदल केल्यास बॅटरी बॅकअप सुधारू शकतो. आजच्या लेखात ज्या काही टिप्स जाणून घेणार आहोत त्या खुद्द कंपनीनेच सुचवलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवसाचा बॅटरी बॅकअप मिळण्यास मदत होऊ शकते.

पॉवर सेव्हिंग मोड

सॅमसंग फोनमधील पॉवर सेव्हिंग मोड हे बॅटरी वाचवण्यासाठी एक उपयुक्त वैशिष्ट्य मानले जाते. हा मोड चालू केल्याने बॅकग्राउंडमधील ॲक्टिव्हिटी मर्यादित होतात आणि काही सिस्टम फिचर्स बॅटरी वापर कमी होतो. यामुळे फोनच्या बॅटरीचे लाईफ वाढण्यास मदत होऊ शकते. हे फिचर्स विशेषतः प्रवासा दरम्यान उपयुक्त ठरू शकते. बरेच वापरकर्ते या फिचर्सकडे दुर्लक्ष करतात, परंतु गरजेच्या वेळी ते बॅटरीचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढवू शकते.

लाइट परफॉर्मन्स मोड

सॅमसंग स्मार्टफोनमधील ‘लाइट परफॉर्मन्स मोड’ हे सेटिंग्ज ऑन केल्याने फोनची बॅटरी अधिक वेळ टिकून राहतेच शिवाय यामुळे फोन जास्त गरम होत नाही. तसेच हे फिचर्स प्रोसेसरचा कमाल वेग किंचित कमी करते, ज्यामुळे बॅटरीचा वापर कमी होतो. विशेष म्हणजे, वेब ब्राउझिंग, सोशल मीडिया वापरणे, कॉलिंग आणि बहुतेक दैनंदिन कामे करताना वापरकर्त्यांना कामगिरीमध्ये कोणताही लक्षणीय फरक जाणवणार नाही. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढू शकते आणि फोन जास्त काळ थंड व सुरळीत चालू राहतो.

अनावश्यक कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये बंद ठेवा

वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि इतर कनेक्टिव्हिटी फीचर्स सतत सक्रिय राहिल्यास बॅटरीचा वापर वाढू शकतो. गरज नसल्यास हे सर्व्हिस बंद करा. कधीकधी फोन सतत नेटवर्क किंवा लोकेशन सिग्नल शोधत राहतो, ज्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. सॅमसंग स्मार्टफोनवरील क्विक सेटिंग्स पॅनलद्वारे ही फीचर्स सहजपणे नियंत्रित केली जाऊ शकतात. केवळ गरजेनुसार ती चालू केल्याने बॅटरीवरील अनावश्यक ताण कमी होतो आणि फोन जास्त काळ टिकतो.

सॉफ्टवेअर अपडेट्स आणि बॅटरी मॅनेजमेंट

बॅटरीच्या परफॉर्मेंससाठी तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. कंपन्या वेळोवेळी बॅटरी ऑप्टिमायझेशन आणि कार्यक्षमतेत सुधारणा करणारे अपडेट्स जारी करतात. तसेच सॅमसंग फोनवरील बॅटरी मॅनेजमेंट टूल्स वापरकर्त्यांना अचूक माहिती पुरवतात. या वैशिष्ट्यांचा वापर केल्यास बॅटरीचे आयुष्य वाढू शकते.

डिस्प्ले सेटिंग्जमधील बदल

स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले सर्वात जास्त बॅटरी वापरतो. स्क्रीनची ब्राइटनेस जास्त ठेवल्याने किंवा जास्त वेळ चालू ठेवल्याने बॅटरी लवकर संपते. सॅमसंग फोनमधील ऑटो-ब्राइटनेस किंवा ॲडॅप्टिव्ह ब्राइटनेस फीचर वापरल्याने स्क्रीन ब्राइटनेस ॲडजस्ट करते. स्क्रीन टाइमआउट कमी ठेवल्यानेही बॅटरी वाचण्यास मदत होते. अनेक वापरकर्ते उच्च रिफ्रेश रेट वापरतात, ज्यामुळे फोन वापरण्याचा अनुभव सुधारतो, पण बॅटरीचा वापरही वाढतो. गरजेनुसार या सेटिंग्जमध्ये बदल केल्यास बॅटरीचे आयुष्य वाढू शकते.

बॅकग्राउंड ॲप्समुळे बॅटरीचा वापर वाढतो

फोन वापरात नसतानाही अनेक ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. हे ॲप्स सतत इंटरनेट, लोकेशन वापरतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपू शकते. सॅमसंग स्मार्टफोनमधील ‘बॅटरी अँड डिव्हाइस केअर’ विभाग जास्त बॅटरी वापरणाऱ्या ॲप्सना ओळखू शकता. जे ॲप्स कमी वापरले जातात, त्यांना स्लीप किंवा डीप स्लीप मोडमध्ये ठेवता येते. यामुळे बॅकग्राउंडमधील बॅटरीचा वापर कमी होते आणि बॅटरीवरील ताण कमी होतो.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा