AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी

पुण्यात धावत्या ट्रकचा थरार घढला. ट्रकने वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन उडी मारल्याची घटना घडली आहे.

Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी
pune shirur accident Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 25, 2026 | 8:11 AM
Share

पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रम्हाजवळ काल भीषण अपघाताची घटना घडली. शाळेच्या बसच्या चाकाखाली येऊन 25 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शिरूरमधून भीषण दुर्घटना समोर आली आहे. पुण्यासहित ग्रामीण भागातही अपघाताच्या भीषण घटना घडत आहेत. शिरूरमध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. रामलिंगपासून अन्नापूरमपर्यंत वाहनांना उडवत चालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली. त्यानंतर ट्रक थेट घरावर धडकला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरकडून राजगुरूनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने कार आणि दोन दुचाकींना धडक दिल्याची थरारक घटना घडली. वाहनांना धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने अन्नापूर परिसरात धावत्या ट्रकमधून अचानक उडी मारली. चालकाने उडी मारताच ट्रकवरील ताबा सुटला आणि सुसाट वेगाने जाणारा ट्रक थेट एका स्थानिक नागरिकाच्या घरावर जाऊन आदळला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही क्षणांतच वाहनांचा पाठलाग, चालकाची उडी आणि घरावर आदळलेला ट्रक असा थरारक प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. ट्रक घराला धडकल्यानंतर वस्तीमधील लोक बाहेर आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हटवली. या अपघातात नेमके किती जण जखमी झाले, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालकाने अचानक धावत्या वाहनातून उडी मारल्याने चालकाचा जीव वाचला. परंतु अनियंत्रित ट्रक थेट घरावर आदळून मोठे नुकसान झाले आहे.

बसखाली चिरडून तरुणीचा मृत्यू 

तत्पूर्वी, पुण्यात सिंहगडमध्ये अपघाताची घटना घडली. पुण्यातील खानापूर बाजूकडून ही बस स्वारगेटच्या दिशेने चालली होती. त्यानंतर सिंहगड रस्त्यावरील ‘हॉटेल ब्रम्हा’ समोर कंचन ही बसच्या पुढील दरावाजातून खाली पडली. त्याचवेळी बाजूने एक शाळेची बस जात होती. या शाळेच्या बसखाली येऊन कंचनचा गंभीर दुखापत होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. कंचनच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वाहतूक व्यवस्थेवरून थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे