AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर या 3 बँक बुडाल्या तर भारताची अर्थव्यवस्था ठप्प होणार, मोठं संकट येणार, तुमचंही खातं आहे का? आरबीआयकडून नावं जाहीर

सध्या भारतामध्ये अशा तीन बँका आहेत, त्या जर बुडाल्या तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो. देश मोठ्या संकटात सापडू शकतो, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे. या बँकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

जर या 3 बँक बुडाल्या तर भारताची अर्थव्यवस्था ठप्प होणार, मोठं संकट येणार, तुमचंही खातं आहे का? आरबीआयकडून नावं जाहीर
RBI Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 9:01 PM
Share

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बँक आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की भारतामध्ये अशा देखील तीन बँका आहेत, त्या जर कोणत्याही कारणामुळे बुडाल्या तर भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते, भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो. याबाबत स्वत: आरबीआयकडून सोमवारी माहिती देण्यात आली आहे. देशात तीन बँक अशा आहेत, त्या जर कोणत्याही कारणामुळे बुडाल्या किंवा बंद झाल्या तर हा भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठा झटका असेल. भारताची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात या तीनच बँकांवर अवलंबून असल्याचं देखील केंद्रीय बँकेनं म्हटलं आहे.

कोणत्या आहेत या तीन बँका?

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, एचडीएफसी बँक HDFC आणि आयसीआयसीआय बँक या तीन बँकांचा या यादीमध्ये आरबीआयकडून समावेश करण्यात आला आहे. या तीन अशा बँका आहेत, ज्या बँकांचं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. जर यातील एखादी बँक जरी अचानक बुडाली किंवा बंद झाली तर हा भारताच्या संपूर्ण बँकिंग सिस्टम आणि अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धक्का असेल, असं आरबीयाने म्हटलं आहे. त्यामुळेच आरबीआयने या बँकांना ‘टू बिग टू फेल’ असं म्हटलं आहे. या बँका एवढ्या मोठ्या आहेत की जर या बँका बुडाल्या तर भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडू शकते.

या बँकाकडे असतो जास्त पैसा

आरबीआयच्या नेमाप्रमाणे जेवढा पैसा आवश्यक आहे, तेवढा पैसा तर या तीन बँकांमध्ये असतोच, परंतु त्याहीपेक्षा अधिक पैसा या बँकांकडे असतो. जर समजा कधी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर आर्थिक संकटामधून बाहेर पडण्यासाठी या पैशांचा उपयोग केला जातो. हाच या मागचा उद्देश आहे. आरबीयाच्या निमयानुसार एसबीआयला आपल्या संपूर्ण पैशांच्या व्यवहारांपेक्षा 0.80 टक्के पैसे जास्त ठेवावे लागतात. एचडीएफसीला 0.40 टक्के तर आयसीआयसीआयला 0.20 टक्के एक्सट्रा पैसा ठेवावा लागतो.

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!