AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत मला गाफील ठेवण्यात आलं, आमदार चंद्रकांत पाटील यांनी डागली तोफ…

आमदारांच्या नाराजीबाबत ज्याला दखल घ्यायची आहे. तो घेईल आणि ज्याला नाही घ्यायची तो नाही घेणार. मला शिवसेनेकडून आणि कोणाकडूनही काही आशा राहिलेली नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महायुतीत मला गाफील ठेवण्यात आलं, आमदार चंद्रकांत पाटील यांनी डागली तोफ...
Shiv Sena MLA Chandrakant Patil (1)
| Updated on: Nov 25, 2026 | 8:50 PM
Share

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतच दोन आमदारात वाद सुरु झाले आहेत. या वादात आता मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे तरी दोन्ही आमदार बधलेले नाहीत हे विशेष. शिवसेनेची मुक्ताईनगराची एकही जागा न मिळाल्याने खंत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. सर्व आमदारांना एक- एक जागा देण्यात आली, मला न दिल्याने माझ्या मनात खंत आहे..दुःख आहे असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार नाराज

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेची मुक्ताईनगरची एकही जागा न मिळाल्याने या आमदाराने खंत व्यक्त केली आहे. सर्व आमदारांना एक एक जागा देण्यात आली, मला न दिल्याने माझ्या मनात खंत आहे दुःख आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेबाबत आणि नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मी ज्याच्या विरोधात लढतो ते लोक त्यांच्यासोबत संबंध चांगले ठेवतात. शिवसेनेकडून आता मला पुन्हा मदत होईल याची अपेक्षा राहिलेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

सत्ता ज्याच्या हातात आहे, त्याला ही जागा मिळाली, माझ्या पदरी ही जागा पडली नाही. मला शिवसेनेची एक तरी जागा मिळावी ही माझी अपेक्षा होती. महायुतीत मला गाफील ठेवण्यात आलं आणि जागा दिली नाही. महायुतीत शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येकी एक ते दोन जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, मला एकही जागा न मिळाल्याने मी नाराज असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला न मिळता रक्षा खडसेंना (भाजपा ) मिळाल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.जागा न मिळाल्याने संशोधन करण्याचा हा विषय माझ्यासाठी आहे.मुक्ताईनगरची जागा ही भाजपाला दिली जात असेल तर बोदवडची तरी जागा मला द्या ही मागणी मी केली होती. नेत्यांच्या पुढे जाता येत नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. माझी आता मुख्यमंत्र्यांना आणि माझ्या नेत्यांना भेटण्याची मुळीच इच्छा नाही. माझ्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मला मदत होईल अशी देखील मला अपेक्षा नाही. कुणाजवळ दुःख मांडायचं आणि रडत जायचं हे काम माझं राहिलेलं नाही, यापुढेही अपक्ष लढू असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!