AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shakespeare Tripathy : धोनी-अनुष्का शर्मासोबत केलं काम, पण नशिबानं फिरवली पाठ; अभिनेता बनला अ‍ॅडल्ट स्टार, म्हणाला, आता भरपूर पैसे…

Shakespeare Tripathy : अभिनेता शेक्सपिअर त्रिपाठीनं नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील संघर्षाबद्दल सांगितलं आहे.

Shakespeare Tripathy : धोनी-अनुष्का शर्मासोबत केलं काम, पण नशिबानं फिरवली पाठ; अभिनेता बनला अ‍ॅडल्ट स्टार, म्हणाला, आता भरपूर पैसे...
| Updated on: Nov 25, 2026 | 8:41 PM
Share

बॉलिवूड आणि टीव्ही मनोरंजनविश्वात अनेक कलाकार आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. मात्र, प्रत्येकालाच अपेक्षित यश मिळतंच असं नाही. काही कलाकारांना काम मिळत नसल्यामुळे वेगळे मार्ग निवडावे लागतात. असंच काहीसं अभिनेता शेक्सपियर त्रिपाठी याच्यासोबत घडलं. एकेकाळी टीव्ही मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम करणारा शेक्सपियर आज अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. विशेष म्हणजे, आपल्या या करिअरच्या निर्णयाबद्दल त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. उलट, सध्या आपण चांगली कमाई करत असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

काय म्हणाला अभिनेता?

शेक्सपियर त्रिपाठीनं वयाच्या 18व्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यानं अनेक जाहिरातींमध्ये काम केलं. त्यानंतर टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. ‘गुमराह’, ‘ये है आशिकी’ आणि ‘ये तेरी गलियां’ यांसारख्या मालिकांमध्ये तो दिसला होता. याशिवाय ‘शादी अभी बाकी है’ या चित्रपटातही त्यानं काम केलं. त्यानं काही शॉर्ट फिल्म्समध्येही भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याला महेंद्रसिंह धोनी, अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, इतकं काम करूनही त्याला अभिनयक्षेत्रात अपेक्षित यश मिळालं नाही.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शेक्सपियरनं आपल्या करिअरमधील संघर्षाबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, सुरुवातीपासूनच त्याला काम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. अनेक ऑडिशन्स दिल्यानंतरही काही प्रोजेक्ट्स हातातून निघून जात होते. त्यानंतर लॉकडाऊन आल्यामुळे मनोरंजनविश्वातील कामंही बंद झाली. या काळात त्याला काही रिव्हिलिंग वेबसीरिजच्या ऑफर्स आल्या. त्यातूनच त्यानं ओटीटी क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. पुढे अ‍ॅडल्ट कंटेंटच्या क्षेत्रातही तो काम करू लागला. आपल्या सध्याच्या करिअरबद्दल बोलताना शेक्सपियरनं समाधान व्यक्त केलं. तो म्हणाला, ‘माझ्या या बदललेल्या करिअरमुळे मी खूप आनंदी आहे. आता जवळपास प्रत्येक आठवड्याला माझे दोन ते तीन शूट असतात. मी चांगले पैसे कमावतोय आणि माझ्या करिअरच्या निवडीबद्दल समाधानी आहे.’

शेक्सपियरने टीव्हीवरील कामाच्या अनुभवाबद्दलही भाष्य केलं. त्यानं अभिनयाचं कोणतंही औपचारिक प्रशिक्षण घेतलं नव्हतं. मात्र, त्याला थिएटरचा अनुभव होता. सुरुवातीला सेटवर काही लोक त्याच्याशी उद्धटपणे बोलायचे. त्यामुळे काम शिकताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यानं या अनुभवांचा कधीही नकारात्मक विचार केला नाही, असंही त्यानं सांगितलं.

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!