AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : भारताच्या टी20 संघात आता वैभव सूर्यवंशी कोणाच्या जागी खेळणार?

53 बॉलमध्ये 200 रनची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय टी-20 संघात नियमित संधी देण्याची मागणी होत आहे. अभिषेक शर्मासोबत वैभव ओपनिंगला उतरू शकतो, असा अंदाजही क्रिकेट विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याला संघात स्थान दिल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागणार?

Vaibhav Sooryavanshi : भारताच्या टी20 संघात आता वैभव सूर्यवंशी कोणाच्या जागी खेळणार?
Vaibhav Sooryavanshi Team India SelectionImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 25, 2026 | 8:31 PM
Share

वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक खेळीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या 53 बॉलमध्ये 200 रन ठोकणाऱ्या वैभवला आता भारतीय टी-20 संघात नियमित संधी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, त्याला केवळ एक-दोन मॅच खेळवून पुन्हा बाकावर बसवण्याऐवजी सातत्याने संधी द्यायला हवी, अशी भूमिका माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्लेषकांनी मांडली आहे. मात्र, वैभवला संघात घ्यायचे झाल्यास नेमके कोणाला बाहेर बसवणार, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला वैभव?

वैभव सूर्यवंशीच्या भारतीय संघातील स्थानावर चर्चा सुरु झाली आहे. एका विश्लेषकाने पुढील टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी ओपनिंगला उतरलेली दिसेल, असा अंदाज व्यक्त केला. वैभवला सातत्याने संधी मिळायला हवी. त्याने केलेली खेळी निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटला आपली क्षमता दाखवणारी आहे, असेही मत व्यक्त करण्यात आले.

मग संजू सॅमसनला बसवणार?

वैभवला संधी देताना दुसऱ्या खेळाडूवर अन्याय होऊ नये, हा मुद्दाही चर्चेत आला. भारतीय संघात स्थान मिळवणारा प्रत्येक खेळाडू गुणवत्तेच्या जोरावरच तिथे पोहोचलेला असतो. त्यामुळे वैभवला खेळवायचे झाल्यास संजू सॅमसनसारख्या खेळाडूला बाहेर बसावे लागू शकते. मात्र, अंतिम निर्णय कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीच्या हातात असतो. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे लक्ष असेल.

सूर्यकुमार यादवही वैभवचा चाहता

दरम्यान, सूर्यकुमार यादवने वैभव सूर्यवंशीचे कौतुक करत त्याला आपली प्रेरणा असल्याचे म्हटले. ‘आता तू माझी प्रेरणा आहेस’, अशा आशयाची पोस्ट त्याने केली. यावरून वैभवच्या खेळीने वरिष्ठ खेळाडूंनाही प्रभावित केले असल्याचे चित्र आहे.

आता भारतीय संघाच्या पुढील टी-20 सामन्यात वैभवला संधी मिळते का आणि मिळाल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वैभवने UAE विरुद्ध केलेल्या 200 धावांनंतर त्याने जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक करणारा वैभव पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!