Vastu Shastra : घराच्या उत्तर दिशेला ठेवा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला काही विशिष्ट गोष्टी ठेवल्या तर त्यामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात, आणि घराला बरकत प्राप्त होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. त्यामुळे उत्तर दिशेचं अध्यात्मामध्ये देखील विशेष महत्त्व आहे. उत्तर दिशेला धनाची दिशा देखील म्हटलं जातं. जेव्हा तुमच्या घराची ही दिशा निर्दोष असते, म्हणजे या दिशेला कोणताही वास्तुदोष नसतो, तेव्हा तुम्हाला कधीही पैशांची, धनाची कमतरता भासत नाही. तुमची तिजोरी सदैव पैशांनी भरलेली असते, परंतु जेव्हा उत्तर दिशेला दोष निर्माण होतो. तेव्हा मात्र तुम्हाला त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो, घरावर सदैव आर्थिक संकट येतात. घरात पैसा टिकत नाही. तसेच इतरही काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेचा कोपरा हा नेहमी स्वच्छ असावा, या भागात कोणत्याही प्रकारची अडचण नसावी, रद्दी, भंगार किंवा खराब इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू या दिशेला ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण अशा काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्या उत्तर दिशेला ठेवणं हे अत्यंत शुभं माण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
कुबेराचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा असल्यामुळे घराच्या उत्तर दिशेला असलेल्या भिंतीला कुबेराचा फोटो लावावा. यामुळे घरात आर्थिक समृद्धी येते, घराची भरभराट होते, असं मानलं जातं.
कुबेर यंत्र – कुबेराच्या फोटो सोबतच उत्तर दिशेला कुबेर यंत्र देखील ठेवणं शुभ मानलं जातं. कुबेर यंत्राची दररोज पूजा करावी.
स्फटिकाचं कासव – कासवाला वास्तुशास्त्रामध्ये धन वृद्धीचं प्रतिक मानलं गेलं आहे, आणि उत्तर दिशा ही धनाची दिशा असते, त्यामुळे उत्तर दिशेला स्फटिकाचं कासव ठेवावं.
वॉटर फाउंटन – उत्तर दिशेला वॉटर फाउंटन ठेवणं देखील शुभ मानलं गेलं आहे. यामुळे बाहेरचा पैसा घराकडे आकर्षित होतो, असं मानलं जातं.
हत्तीची मूर्ती – हत्तीला देखील धनाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे उत्तर दिशेला हत्तीची मूर्ती असावी, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. यामुळे घराची भरभराट होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
