Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
Maharshtra News LIVE : नंदुरबारच्या अतिदुर्गम मणीबेली गावातील देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवींना अखेर न्याय मिळणार. टीव्ही९ मराठीने रविता तडवी यांची व्यथा प्रशासनासमोर आणल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल.

LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्रातला कांदा दिल्लीला जाणार
लासलगावहून दिल्लीला ८४० टन कांदा होणार आज रवाना. शासनाच्या खरेदीतील कांदा दिल्लीकरांना कमी दरात होणार उपलब्ध. २१ व्हेगनच्या मालगाडीत आज दहा वाजता लासलगाव रेल्वे स्थानकात कांदा लोडिंगला होणार सुरुवात. कांदा लोडिंगसाठी लागणार सात ते आठ तासांचा कालावधी. लासलगावहून दिल्लीपर्यंत कांदा पोहोचण्यासाठी लागणार सुमारे २४ तास. कमी दरातील कांदा बाजारात आल्याने शेतकऱ्यांच्या कांदा दरावर दबावाची शक्यता. शासनाच्या निर्णयामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण. दिल्लीकरांना दिलासा; मात्र शेतकऱ्यांच्या कांदा दरावर घसरणीची भीती.
-
महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन
नागपूर जिल्ह्यात महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. पीएफ, रविवारी सुट्टी मिळावी, कामगार सुरक्षा आणि इतर मागण्यांसाठी कामगारांचं आंदोलन. कंपनीच्या मुख्य गेटबाहेर जमले हजारो कामगार. हिंगणा MIDC परिसरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कंपनीच्या गेटवर पोलीस सुरक्षा.
-
-
..तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटना टळली असती
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण. ज्या अतिदक्षता विभागात आगीची घटना घडली त्या दुर्घटना ग्रस्त विभागाच्या जवळच्या दुसऱ्या युनिटमध्ये महिन्यापूर्वी वॉशिंग मशीन जळाली असल्याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी हा प्रकार दडवून ठेवला. तेव्हा हा प्रकार वरिष्ठना सांगितला असता तर विद्युत यंत्रणेतील बिघाड समोर आला असता आणि ही दुर्घटना टळली असती.
-
धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
जिल्हा परिषदेचा तब्बल 71 कोटींचा निधी शासनाकडे परत. स्थगिती, आचारसंहिता आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे निधी खर्चाला खीळ. रस्ते, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठ्यासह विकासकामांना मोठा फटका. डीपीसीच्या कामांवरील आठ महिन्यांची स्थगिती अन् निवडणूक आचारसंहितेमुळे निधी खर्चासाठी पडला वेळ कमी. अखर्चित निधी परत मिळावा, जिल्हा परिषदेची शासनाकडे मागणी; मात्र शासनाचा स्पष्ट नकार. सामान्य प्रशासन ३० कोटी, बांधकाम १५ कोटी, पाणीपुरवठा ६ कोटी, पंचायत ६ कोटींचा निधी अखर्चित.
पुण्याच्या खेड तालुक्यातील वेताळे येथे रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने शेतकरी फुलाबाई बाबाजी बोंबले यांच्या शेतातील फुलोऱ्यावर आलेल्या सोयाबीन पिकावर विषारी तणनाशकाची फवारणी केली. अडीच एकर क्षेत्रातील सोयाबीन आणि ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.याबाबत खेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या व्यासपीठावर गोमूत्र शिंपडल्याच्या निषेधार्थ 14 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये काँगेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सनातन धर्म आणि मनुवादा विरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यावरून हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. हिंदूवादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
Published On - Aug 25,2026 8:00 AM
