AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Kriti Sanon : अभिनेत्री कृती सेनॉन हिने एका जाहिरातीत घतलेल्या कपड्यांचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर आता भाजप महिला खासदाराने कृतीवर निशाणा साधला आहे... ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून..., ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
Kriti Sanon
| Updated on: Aug 25, 2026 | 8:27 AM
Share

Kriti Sanon : बॉलिवूडची लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री कृती सेनॉन आता तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, नुकताच केलेल्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. सध्या ज्या जाहिरातीवरुन वाद टोकाला पोहोचला आहे, ती जाहिरात रक्षाबंधन हा सण लक्षात घेत तयार करण्यात आली आहे. पण जाहिरातीत कृती हिच्या इंडो-वेस्टर्न लूकमुळे वाद विकोपास गेला आहे. सांगायचं झालं तर, सणांच्या दिवशी भारतीय संस्कृतीत पारंपरिक कपडे घालण्याची प्रथा आहे. पण कृती हिने जे कपडे घातले आहेत, त्यावर अनेकांनी टीका केली आहे.

आता भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी देखील कृतीच्या कपड्यांवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कंगना यांनी कृती हिला चांगलंच सुनावलं आहे. ‘भावाला काय बिकिनी घालून राखी बांधशील का?’ असा म्हणत कृतीवर कंगना यांनी निशाणा साधला आहे. सध्या कंगना यांची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत कंगना म्हणाल्या, ‘आजच्या दिवसांत महिला त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालू शकतात. त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. वेस्टर्न ड्रेसपासून लेहेंगा, जीन्स, साडी, बिकीनी आणि सलवार – कुर्ती सर्वकाही आहे. इतके सारे पर्याय असताना, कोणती महिला भावाला बिकिनी घालून राखी का बांधेल?’, कंगना असं देखील म्हणाल्या की, एका विशिष्ट उद्देशानेच ती जाहिरात विचित्र आणि ‘क्रीपी’ म्हणजेच अस्वस्थ करणारी वाटेल अशा प्रकारे बनवण्यात आली होती.

सांगायचं झालं तर, कृती हिची जाहिरात चर्चेत आली. तेव्हा अभिनेत्रीच्या लूकवर अनेकांना निशाणा साधक, कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या. एक नेटकरी कमेंट करत म्हणाली, ‘रक्षाबंधन आहे तर, पूजेचं ताट, टिळा कुठे आहे. राखीच्या दिवशी असे कपडे कोण घालतं…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘जाहिरात जाणूनबुजून अशी तयार करण्यात आली आहे. ब्रँड किंवा एजन्सीने लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा चुकीचा दृष्टिकोन स्वीकारला आहे. कृतीच्या या लूकबद्दल लोक आपली नाराजीही व्यक्त करत आहेत. ‘

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा