AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा

Kunal Chandgude Case: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर अख्ख्या चांदगुडे कुटुंबाचा एका झटक्यात अंत झाला. या घटनेने राज्यभर नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली.

Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी... कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
| Updated on: Aug 25, 2026 | 10:33 AM
Share

Kunal Chandgude Khawadya Dongar : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर अख्ख्या चांदगुडे कुटुंबाचा एका झटक्यात अंत झाला. या घटनेने राज्यभर नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली. सुरुवातीला आयफोन हे कारण असल्याचे समोर आले होते पण नंतर या घटनेला अनेक फाटे फुटले, चांदगुडे कुटुंबातील वाद हे तिघांच्या मृत्यूचं कारण असल्याचं समोर आले. गेल्या 17 वर्षापासून चांदगुडे कुटूंबातील दुरावा आता कमी होत होता यामुळे मुरलीधर आणि संगिता यांच्यात सतत वाद होत होता अशी माहिती आता कुणालच्या आत्या शोभा म्हसके यांनी दिली आहे.

या घटनेनंतर कुणाल चांदगुडेची आई संगीता चांदगुडे यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओत संगीता चांदगुडे यांनी आपल्या नणंदेवर आपल्या संसारात लुडबुड करत असल्याचा आरोप केले आहेत.  संगीता चांदगुडे यांच्या यूट्यूब चॅनेलवर 28 हजार सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनेलवर त्यांचे एकूण 178 व्हिडिओ उपलब्ध आहेत. काही जुन्या व्हिडिओंमध्ये त्यांनी नातेवाईकांकडून आरोप केला होता. संपत्ती आणि पैशांवरुन त्रास दिला जात असल्याची माहिती दिली होती. संगीता यांच्या या व्हिडिओंनी सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संगीता यांचा मुलगा कुणालच्या आत्महत्येमागेही कौटुंबिक कलह हेच कारण असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान कुणालची आत्या शोभा मस्के यांनी सांगितल्यानुसार, संगिता आणि मुरलीधर यांच्या नात्यात चार महिन्यापासून खटके उडत होते. मुरलीधर हा चार महिन्यापूर्वी  एका भाच्याच्या लग्नाला आला, मात्र संगीता उपस्थित नव्हती. लग्नाच्याच दुसऱ्या दिवशी मधल्या बहिणीच्या मुलाचे अचानक निधन झाले. त्यामुळे मुरलीधर दहा दिवस थांबले होते, हीच गोष्ट पत्नी संगीताला खटकली. यानंतर संगीताने माझ्या भावाला घरातून बाहेर काढले.

चांदगुडे परिवारातील अंतर्गत वाद इतका मोठा होता हे त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी दिसून आला. मुरलीधर चांदगुडे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर जालना येथे अंत्यसंस्कार केले. तर संगीता आणि कुणालचे मृतदेह मुकुंदवाडी येथील संगीता यांच्या माहेरी नेण्यात आले आणि तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा