भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव… मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्…
कोल्हापूर येथील प्रसिद्ध महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुशोभीकरण आणि जीर्णोद्धार कामाची आज औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर येथील प्रसिद्ध महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुशोभीकरण आणि जीर्णोद्धार कामाची आज औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महालक्ष्मी मंदिर हे देशाचे आराध्य दैवत असल्याचे सांगत मंदिराच्या विकासाचे स्वप्न आता पूर्ण होत असल्याचे म्हटले.
अमित शाह यांच्या हस्ते मंदिर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूरसारख्या मोठ्या शक्तीपीठाचा विकास व्हावा, अशी भावना महाराष्ट्रासह दिल्लीतील नेत्यांचीही होती, असे फडणवीस यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे या सभेतील अनेक हालचाली चर्चेचा विषय ठरल्या, जसे की एकनाथ शिंदे जाहीर सभेच्या मधूनच ताडकन उठले अन् कॉल अटेंड केला. यानंतर आणखी एका कृतीने विशेष लक्ष वेधले. मंचावर नेत्यांचा सत्कार करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंआधी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे नाव घेण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला अडवून मान्यवरांच्या यादीतील चूक दुरुस्त करण्यास सांगितली. यानंतर एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला. नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेच्या नावातील गोंधळामुळे या प्रकाराची विशेष चर्चा आहे.
Published on: Jun 20, 2026 06:13 PM
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर

