Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता थेट मतदारसंघात उतरून संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता थेट मतदारसंघात उतरून संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
याच अनुषंगाने उद्धव ठाकरे 27 जून रोजी यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या भेटी घेणार आहेत. खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे प्रथमच यवतमाळमध्ये जाणार असल्याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत हालचाली वाढल्या असून आगामी काळात आणखी काही राजकीय निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरल्यामुळे ठाकरे गट पुन्हा संघटना मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. राज्यातील राजकीय वातावरण त्यामुळे अधिक तापले आहे.
Published on: Jun 20, 2026 06:54 PM
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...

