AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुध ग्रहाचे कर्क राशीत संक्रमण, ‘या’ 5 राशींना होणार सर्वाधिक फायदा

22 जून रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा लोकांच्या विचारांमध्ये, व्यवसायात आणि नातेसंबंधांमध्ये भावनिक खोली दिसून येईल. तसेच काही राशींचे भाग्य उजळेल. चला तर मग कोणत्या आहेत या भाग्यवान राशी जाणून घेऊयात.

बुध ग्रहाचे कर्क राशीत संक्रमण, 'या' 5 राशींना होणार सर्वाधिक फायदा
Mercury transits
| Edited By: | Updated on: Jun 21, 2026 | 12:02 AM
Share

बुध ग्रह हा आपल्या मनावर, बोलण्यावर आणि व्यवसायावर नियंत्रण ठेवतो. तर येत्या 22 जून 2026 रोजी बुध ग्रह हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांवर होणार आहे. मात्र हे परिवर्तन विशेषतः कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन राशींसाठी खूप चांगला असणार आहे. तर या राशीची लोकं आतापर्यंत जे काही काम शांत डोक्याने किंवा केवळ फायदे-तोटे विचारात घेऊन करत होते आता ते थोड्या भावनिकतेने केले जाईल. तसेच या परिवर्तनामुळे त्यांना करिअरपासून ते आर्थिक बाबींपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संधी मिळतील. चला तर मग या परिवर्तनाचा या राशींवर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊयात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनो बुध ग्रहाचे तुमच्या राशीत आगमन हे अत्यंत जादुई असणार आहे. या परिवर्तनामुळे तुम्हाला खूप जास्त आत्मविश्वास जाणवेल. तुमच्यापैकी जी लोकं आपली मते व्यक्त करण्यास थोडे संकोच करत होते, ते आता मोकळेपणाने बोलू शकतील. तुम्ही नवीन लोकांशी जोडले जाल आणि या नेटवर्किंगमुळे अशा संधी उपलब्ध होतील ज्यांची तुम्ही कदाचित कधी कल्पनाही केली नसेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे तुम्हाला कधीकधी गोष्टींचा जास्त विचार करण्याची सवय असते, त्यामुळे यावेळी तो अतिविचार टाळा.

कन्या रास

कन्या रास असलेल्यांनी बुध हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असून तो आता तुमच्या लाभाच्या घरात आहे. हे समजून घ्या की यशाचे दरवाजे उघडण्याची किल्ली आता तुमच्या हातात आहे. तुमचे मित्र आणि जुने सहकारी आज तुमची सर्वात मोठी ताकद बनतील. तुम्ही जे काही हाती घ्याल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आर्थिकदृष्ट्याही हा तुमच्यासाठी एक उत्तम काळ आहे. फक्त इतरांना मदत करायला विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही इतरांना मदत करतात तेव्हा ती सकारात्मकता तुमच्याकडे परत येते.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी झेप मिळणार आहे. बुध तुमच्या दहाव्या घरातून भ्रमण करत आहे. कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता आणि ओळख वाढणार आहे. जर तुम्हाला एखाद्या बैठकीत तुमचा मुद्दा मांडायचा असेल किंवा एखादा सौदा पक्का करायचा असेल, तर तुमची भाषा गोड आणि प्रभावी ठेवा. लोक तुमच्या शब्दांनी मोहित होतील. तुमचा मुद्दा मांडण्याची तुमची क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. फक्त तुमच्या कामाबद्दल गंभीर आणि शिस्तबद्ध राहा.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमणामुळे भाग्य तुमच्या बाजूने आहे. बुध तुमच्या भाग्यस्थानात आहे. जर तुम्ही काही दिवसांपासून एखादा नवीन विषय शिकण्याचा विचार करत असाल, तर आता यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. लांबचे प्रवासही खूप फलदायी ठरतील. तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांकडून आणि वडीलधाऱ्यांकडून असा सल्ला मिळेल, जो तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही इतके उत्सुक असाल की, तुमची प्रगती किती वेगाने होत आहे हे तुमच्या लक्षातही येणार नाही.

मीन रास

मीन राशीच्या व्यक्ती या आधीपासूनच खूप सर्जनशील आहात आणि आता बुध त्यांच्या पाचव्या घरात प्रवेश करत आहे, ज्यामुळे या लोकांची सर्जनशीलता आणखी वाढेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी कराल. जर तुम्ही कोणत्याही कलात्मक कार्यात गुंतलेले असाल, तर आज तुम्ही जे काही तयार कराल ते इतरांना खूप आवडेल. तुमच्या कामात तुमच्या भावनांचा समावेश करा; लोकांना ते मनापासून जाणवेल.

त्यातचा या परिवर्तनाचा परिणाम हा वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामातून आणि मित्रांकडून खूप फायदा होईल.

मकर राशीच्या लोकांचे तुमच्या जोडीदारासोबत असलेले कोणतेही छोटे-मोठे मतभेद आता मिटतील.

मेष राशीच्या लोकांचे घरगुती कामांमधील गुंतागुंत हळूहळू कमी होईल आणि शांतता परत येईल.

कुंभ राशीच्या लोकांनो फक्त तुमचे आरोग्य आणि काम यांच्यात संतुलन साधा, म्हणजे सर्व काही ठीक होईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला