AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी

वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी

| Updated on: Aug 25, 2026 | 9:32 AM
Share

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या शक्यतेवर भाष्य करताना 2029 पर्यंतच त्यांना संधी असल्याचे म्हटले आहे. 2029 नंतर भाजपला अशी संधी मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर आमचे स्वागतच आहे. त्यांनी महाराष्ट्रात राहावे की दिल्लीत जावे, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र मोदी-शहा यांच्या […]

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या शक्यतेवर भाष्य करताना 2029 पर्यंतच त्यांना संधी असल्याचे म्हटले आहे. 2029 नंतर भाजपला अशी संधी मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर आमचे स्वागतच आहे. त्यांनी महाराष्ट्रात राहावे की दिल्लीत जावे, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र मोदी-शहा यांच्या जोडीमध्ये एखादा मराठी माणूस पंतप्रधान झाला, तर त्याचे आम्ही स्वागत करू.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Aug 25, 2026 09:32 AM

Follow Us