AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ

साखरेचे भाव अचानक गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला मोठा फटका बसलेला असताना रेशन दुकानात सुरु असलेल्या भोंगळ कारभारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशात सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
| Updated on: Aug 25, 2026 | 12:06 PM
Share

साखरेचे भाव अचानक गगनाला भिडले आहेत. आता सणासुदीच्या काळात साखरेच्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचं तरी कसं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी 40 – 50 किलो रुपयांनी विकली जाणारी साखर आता 100 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत साखरेचे भाव वाढतात की घसरतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर साखरेचा प्रश्न गंभीर असताना रेशनच्या दुकानात सुरु असलेल्या भोंगळ कारभार देखील समोर आला. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगायचं झालं तर, रेशन दुकानातून पात्र नागरिकांनी धान्य विकत घेता येतं. गहू, तांदूळ, साखर आणि केरोसीन यांसारख्यवस्तू मिळतात. पण रेशन दुकानात मिळणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं वास्तव समोर आलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील रेशन दुकानात अत्यंत निकृष्ट दर्जाचे तांदूळ मिळत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रेशनच्या दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ ”, अशा शब्दात नागरिकांना आपला संताप व्यक्त केला. एवढंच नाही तर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदाांच्या केबिनसमोर पोहोचले.

तहसीलदाांच्या केबिनसमोर पोहोचल्यानंतर, नागरिकांनी रेशन दुकानात वाटव करण्यात आलेले तांदूळ थेट तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ओतून दिले आणि ‘अशा तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ ” आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला..

या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय रेशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. “जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का ?” असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला..

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच