AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला दोनच..

देशभरात साखरेच्या दरात मोठी वाढ होत आहे. यासोबतच टंचाईची शक्यता असल्याने लोक मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करत आहेत. साखर टंचाईची भीती निर्माण झाल्याने साखर खरेदीसाठी नागरिक धाव घेत आहेत. स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये प्रति किलो दिली जात आहे.

साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला दोनच..
Sugar
| Updated on: Aug 25, 2026 | 11:37 AM
Share

साखरेचा किमती वाढताना दिसत आहेत. दिवाळीपूर्वीच साखर 100 पार जाण्याची शक्यता आहे. त्यामध्येच साखर खरेदीवर लोकांनी भर दिला. त्यातच आता सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी. साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात सभासदांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे 27 रुपये प्रतिकिलो ही साखर दिली जातेय. साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते.

अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच सभासद शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केलीय. पहिल्यांदाच अशी गर्दी कारखान्याबाहेर शेतकरी सदस्यांनी केल्याचे बघायला मिळतंय. सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी होतंय. किराणा दुकान, मार्ट, डिमार्ट अशा सर्वच ठिकाणी साखरेसाठी लोकांनी मोठी गर्दी केलीये.

बुलढाण्यात स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये किलो मिळतंय. साखर खरेदीवर निर्बंध घालण्यात आलीत. स्मार्ट बाजारात दिली जातंय प्रतिव्यक्ती एक किलो किंवा दोन किलो साखर. दिवसेंदिवस साखरेच्या वाढत्या किमती, संभाव्य साखर टंचाईची शक्यता लक्षात घेता बुलढाण्यातील खामगाव येथील स्मार्ट बाजार मॉलमध्ये प्रति व्यक्ती एक किंवा दोन किलो साखर दिली जात आहे.

यामुळे मात्र ग्राहकांमध्ये साखर टंचाईची भीती निर्माण झाल्याने साखर खरेदीसाठी नागरिक धाव घेत आहेत. स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये प्रति किलो दिली जात आहे, तर खुल्या बाजारात साखरेची किंमत 70 ते 80 रुपये प्रति किलो आहे. स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती एक किलो साखर दिली जाणार असल्याचा बोर्ड लावल्याने ग्राहकांमध्ये साखर टंचाईची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे.

डिमार्टमध्येही ग्राहकांनी साखर खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. साखरेची टंचाई आणि साखरेचे वाढणारे भाव याकरिता अगोदरच साखर खरेदी ग्राहकांकडून केली जात आहे. डिमार्टकडूनही साखर खरेदीबद्दल मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. ठरावीक साखरच लोकांना मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान