Ladki Bahin : लाडक्या बहिणींनो थेट 3000 रुपये मिळणार? डिसेंबरमध्ये बँक खात्यात…नवी महत्त्वाची अपडेट आली!
शेतकऱ्यांना मदत दिल्यानंतर सरकारने लाडक्या बहिणींनाही दिवाळीच्या अगोदरच सन्मान निधी द्यावा, अशी मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळी सुरू होण्याआधीच 1500 रुपयांचा लाभ दिला.

Ladki Bahin : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. महिलांना ही आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रत्येक महिन्याला सरकार कोट्यवधी रुपयांची तरतदू करते. दिवाळीच्या तोंडावर सरकारने सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यावर पाठवले. आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना नेमके कधी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेय. असे असतानाच लाडक्या बहिणींना एकदाच 3000 रुपये मिळणार का? असे आता विचारले जातेय.
लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले
राज्य सरकारने आम्ही शेतकऱ्यांची दिवळी कडू होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करू, असे सांगितले होते. या घोषणेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना 5000 रुपयांची आर्थिक मदत केली. शेतकऱ्यांना मदत दिल्यानंतर सरकारने लाडक्या बहिणींनाही दिवाळीच्या अगोदरच सन्मान निधी द्यावा, अशी मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळी सुरू होण्याआधीच 1500 रुपयांचा लाभ दिला. लाडक्या बहिणींना मिळालेला हा लाभ सप्टेंबर महिन्याचा होता. ऑक्टोबर महिन्यात सरकारने लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पसै दिले.
ऑक्टोबर महिन्याचे पैसे थेट डिसेंबरमध्ये मिळणार का?
आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे सरकार नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत लाडक्या बहिणींना देऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु हा अंदाज खरा न ठरल्यास ऑक्टोबर महिन्यांचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना थेट डिसेंबर महिन्यात मिळू शकतात.
डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार का?
दरम्यान, लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचा सन्मान निधी मिळालेला नाही. दिवाळी संपली आहे. असे असताना सरकारने नोव्हेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना पैसे न दिल्यास डिसेंबरमध्ये थेट 3000 रुपये मिळू शकतात का? असा प्रश्न विचारला जातोय. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सरकारने डिसेंबरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्यास लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये एकत्र मिळू शकतात.
सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही
दरम्यान, सरकारने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे एकत्र पैसे देण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. सरकारने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सरकारी सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
