AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेस बंद, रुग्णालयातही जेवण मिळेना…; राज्यातील गॅस टंचाईचे भीषण वास्तव समोर, कुठे काय स्थिती?

आखाती देशांतील युद्धामुळे महाराष्ट्रात व्यावसायिक गॅसचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. घाटी रुग्णालय, येवला वृद्धाश्रम आणि सोलापूरच्या मेसमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली असून रुग्ण व वृद्धांचे हाल होत आहेत.

मेस बंद, रुग्णालयातही जेवण मिळेना...; राज्यातील गॅस टंचाईचे भीषण वास्तव समोर, कुठे काय स्थिती?
LPG Gas Shortage
| Updated on: Mar 15, 2026 | 11:26 AM
Share

इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा आणि विस्कळीत पुरवठा साखळीचा मोठा फटका आता महाराष्ट्रातील सार्वजनिक सेवांना बसू लागला आहे. सध्या राज्यभरात व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालये, वृद्धाश्रम आणि अनाथालयांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी धुराच्या कचाट्यात चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या घाटी रुग्णालयात गॅस टंचाईचे गंभीर पडसाद उमटले आहेत. गॅसअभावी येथे २०० लोकांचा स्वयंपाक आता चुलभट्टीवर केला जात आहे. चूल पेटवल्यामुळे जेवण तयार होण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे नातेवाईकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. सध्या केवळ पोहे आणि उपमा यांसारख्या सोप्या पदार्थांना प्राधान्य दिले जात असून इतर मेन्यू बंद करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला तातडीने पत्र पाठवून गॅस पुरवठ्याची मागणी केली आहे. रुग्णालयाकडे केवळ पुढील ४ दिवसांचा साठा शिल्लक आहे. यामुळे दररोज १,००० रुग्णांना दिले जाणारे विनामूल्य जेवण धोक्यात आले आहे.

नाशिकच्या येवला तालुक्यातील शिरसगाव येथील सेंगऋषी वृद्धाश्रमात हृदयद्रावक परिस्थिती आहे. येथे ३५ वृद्ध आणि ५ निराधार मुले वास्तव्यास आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने आश्रम चालक नवनाथ जराड यांनी चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. मात्र, वाढत्या वयामुळे या वृद्धांना चुलीच्या धुराचा प्रचंड त्रास होत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गॅस नाही मिळाला तर या निराधारांना सांभाळणे कठीण होईल, अशी भीती संचालकांनी व्यक्त केली आहे.

शासकीय रुग्णालयातील मेस बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील विद्यार्थी उपहारगृहाचे (मेस) चालक ज्योतिबा गुंड यांनी आपली व्यथा मांडली आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा होत नसल्याने त्यांनी अनेक पदार्थ बनवणे बंद केले आहे. वेळेत गॅस मिळाला नाही तर मेस आणि हॉटेल बंद करावे लागेल. ज्यामुळे विद्यार्थी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची उपासमार होऊ शकते.

महामार्गावरील हॉटेल्समध्ये चूल संस्कृती

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातही व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सुप्रसिद्ध ‘विजय हॉटेल’ सह अनेक ठिकाणच्या किचनमध्ये आता गॅसऐवजी लाकडांचा वापर करून चुलीवर जेवण बनवले जात आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांचा खर्च आणि वेळ दोन्ही वाढत आहे.

दरम्यान आखाती देशांतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका समाजातील दुर्बल घटकांना रुग्ण, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुळे सरकारने तातडीने व्यावसायिक गॅसचा कोटा सुरक्षित करावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल