AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय, पुन्हा नियम बदलले

LPG Gas Booking Rule : युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी आणखी वाढवला आहे.

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय, पुन्हा नियम बदलले
LPG Gas Booking Rule ChangeImage Credit source: Google
| Updated on: Mar 09, 2026 | 7:31 PM
Share

मध्य-पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे, कारण तेल आणि नैसर्गिक वायु पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. अशातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी आणखी वाढवला आहे. याचा फटका थेट सर्व सामान्य जनतेला बसणार आहे. सरकारने गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नेमका काय निर्णय घेतला ते सविस्तर जाणून घेऊयात.

LPG सिलेंडर बुकिंगचा कालावधी वाढला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना सरकारने हेही स्पष्ट केले आहे की सध्या घरगुती गॅस, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. मात्र साठेबाजीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

याआधीचा निर्णय काय होता

पेट्रोलियम मंत्रालयाने तीन दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवस केला होता. आता तो आणखी वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन सिलेंडर बुकिंगच्या दरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. म्हणजे जर तुम्ही 1 तारखेला शेवटचा बुक केला असेल तर आता तुम्हाला 25 तारखेआघी सिलिंडर बुक करता येणार नाही.

LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत 114.5 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार राजधानी दिल्लीत आता 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलेंडर 913 रुपयांना मिळत आहे, जो यापूर्वी 853 रुपयांना मिळत होता. गेल्या एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. हे नवीन दर 7 मार्चपासून लागू झाले आहेत.

IOC च्या वेबसाइटनुसार मुंबईमध्ये नॉन-सब्सिडी एलपीजीची किंमत 912.50 रुपये झाली आहे. तर कोलकातामध्ये ही किंमत 939 रुपये झाली आहे. तसेच चेन्नईत 14 किलोंच्या सिलिंडरसाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढला आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटसारख्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल एलपीजीच्या 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 114.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता या सिलेंडरची किंमत 1,883 रुपये झाली आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ