नाशिक पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, वाकी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक

नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. वाकी बुद्रुक मधून सेमी हाय स्पीड रेल्वेला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. Nashik Pune Semi High Speed Railway Project

नाशिक पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, वाकी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक
वाकी बुद्रुकचे शेतकरी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jun 19, 2021 | 5:07 PM

पुणे: नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. वाकी बुद्रुक मधून सेमी हाय स्पीड रेल्वेला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. भूसंपादन करत असताना कुक्कुटपालन प्रकल्प ,घर,ओटा,बोअर वेल,कांद्याची चाळ,विहीरी व इतर अनेक स्वरूपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी या कारणांमुळे सेमी हाय स्पीड रेल्वेच्या भूसंपदानाला विरोध केला आहे. (Nashik Pune Semi High Speed Railway Project farmers oppose land acquisition)

शेतकऱ्यांना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी बैठक

पुणे-नाशिक दरम्यान नवीन दुहेरी मध्यम उच्च वेगवान ब्रॉडगेज लाईनच्या विद्युतीकरणासह बांधकामाकरिता जमीन खासगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड राजगुरुनगरचे अधिकारी विक्रांत चव्हाण, महारेलचे अधिकारी व शेतकरी या सर्वांची बैठक भैरवनाथ मंगल कार्यालय वाकी बुद्रुक याठिकाणी करण्यात आले होते.

पुणे ते नाशिक दरम्यान होत असलेल्या देशातील पहिल्या हायस्पीड प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना थेट माहिती देण्यासाठी व शेतकर्‍यांच्या अडचणी व तक्रारी समजून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांचा विरोध का?

रेल्वेसाठी भूसंपादन करत असताना, जर रेल्वे ही शेती क्षेत्रातून गेल्यानंतर दुतर्फा बाजूला अल्प स्वरूपात जागा सुटत आहे. या जागेचा शेतकऱ्यांना काडीमात्र फायदा होणार नाही. भूसंपादन करत असताना कुक्कुटपालन,घर,ओटा,बोअर वेल,कांद्याची चाळ,विहीरी व इतर अनेक स्वरूपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनला विरोध केला आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्पाची वैशिष्ट्ये

🔹235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग 🔹रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार 🔹 रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 कि.मी. पर्यंत वाढविणार 🔹पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार 🔹वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प 🔹पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी 🔹18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित 🔹प्रवासी आणि मालवाहतुक चालणार 🔹रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य 🔹प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार 🔹प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा 🔹कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार 🔹विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार

संबंधित बातम्या:

Gold Rate Today : जळगावात सोनेदरात तब्बल दीड हजारपेक्षा अधिक रुपयांनी घसरण, तोळ्याचा भाव किती?

लॉकडाऊन पूर्णपणे हटवणारं पहिलं राज्य, ‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला

(Nashik Pune Semi High Speed Railway Project farmers oppose land acquisition)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें