AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : जळगावात सोनेदरात तब्बल दीड हजारपेक्षा अधिक रुपयांनी घसरण, तोळ्याचा भाव किती?

कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत.

Gold Rate Today : जळगावात सोनेदरात तब्बल दीड हजारपेक्षा अधिक रुपयांनी घसरण, तोळ्याचा भाव किती?
सोन्याचा दर
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 3:36 PM
Share

जळगाव : कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. सध्या जळगावमध्ये सोन्याचे दर 46 हजार 700 रुपये प्रतितोळापर्यंत खाली आले आहेत. जळगाव सराफ बाजारात शनिवारी सोन्याचे दर जीएसटी शिवाय 46 हजार 700 रुपये, तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 100 प्रतितोळा असे नोंदवण्यात आले (Latest Gold rate today 19 June 2021 in Jalgaon Maharashtra).

सध्या सुरू असलेल्या जून 2021 महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. दुसरीकडे, सुरक्षित परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सोन्याची मागणी घटली आहे.

सोने दरात घसरणीची कारणं

स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. या प्रमुख कारणांमुळे सोन्याचे दर घसरत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर देखील होत आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कमी झाले आहेत.

लग्नसराई जवळपास आटोपली आहे. त्यामुळे सोन्याला मागणी नाही. याच कारणामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्यांची लग्ने आहेत, असे लोक सध्या सोने घेत आहेत, अशी माहिती सोने व्यापारी पप्पूशेठ बाफना यांनी दिली.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 18 June 2021):

दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत 188 रुपयांची वाढ (Gold rate today) झाली. यासह प्रतितोळा सोन्याचे दर 46,460 रुपयांवर पोहचले.

चांदीची नवी किंमत (Silver Price on 18 June 2021):

सोन्याशिवाय चांदीच्या किमतीतही वाढ झालीय. चांदीच्या दरात 173 रुपयांची वाढ होऊन (Silver price today) 67,658 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 17 June 2021):

दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 861 रुपयांनी कमी होऊन 46,863 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. बुधवारी (16 जून) सोन्याचे दर 47,724 रुपये प्रति तोळावर बाजार बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,810 डॉलर प्रति औंस दराने विकलं जात आहे.

चांदीची नवी किंमत (Silver Price on 17 June 2021):

दुसरीकडे दिल्लीतील सराफ बाजारात चांदीच्या किमतीतही पडझड झालेली पाहायला मिळाली. एक किलोग्रॅम चांदीच्या किमतीत 1,709 रुपये घट होऊन 68,798 रुपये दर झाला. बुधवारी (16 जून) हा दर 70,507 रुपये प्रति किलोग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 26.89 डॉलर प्रति औंस आहे.

हेही वाचा :

Gold Silver Latest Price: मोठ्या पडझडीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ, वाचा काय आहे प्रतितोळा दर

स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…

Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Latest Gold rate today 19 June 2021 in Jalgaon Maharashtra

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.