AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Latest Price: मोठ्या पडझडीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ, वाचा काय आहे प्रतितोळा दर

रुपयात तेजी दिसल्यानंतर आज (18 जून) सोने आणि चांदीच्या किमतीतही (Gold Silver latest price) वाढ झालेली पाहायला मिळाली.

Gold Silver Latest Price: मोठ्या पडझडीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ, वाचा काय आहे प्रतितोळा दर
सोन्याचे दागिने
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 9:13 PM
Share

Gold Price Today नवी दिल्ली : मागील आठवडाभरातील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात काहीशी तेजी पाहायला मिळाली (Share Market Updates). 8 दिवसांपासून रुपयांच्या मुल्यात होणारी पडझड अखेर आज थांबली (Dollar vs Rupees) आणि डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी वधारला. यासह रुपया 73.86 वर बंद झाला. रुपयात तेजी दिसल्यानंतर आज (18 जून) सोने आणि चांदीच्या किमतीतही (Gold Silver latest price) वाढ झालेली पाहायला मिळाली. आज सोने 188 रुपयांनी महागले आणि चांदी 173 रुपयांनी महागली (Gold Silver prices increases Know latest price 18 June 2021).

दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत 188 रुपयांची वाढ (Gold rate today) झाली. यासह प्रतितोळा सोन्याचे दर 46,460 रुपयांवर पोहचले. गुरुवारी (17 जून) सोन्याचे दर 46,272 रुपये होते. सोन्याशिवाय चांदीच्या किमतीतही वाढ झालीय. चांदीच्या दरात 173 रुपयांची वाढ होऊन (Silver price today) 67,658 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. गुरुवारी चांदीचे दर 67,485 रुपये होते.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 17 June 2021):

दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 861 रुपयांनी कमी होऊन 46,863 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. बुधवारी (16 जून) सोन्याचे दर 47,724 रुपये प्रति तोळावर बाजार बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,810 डॉलर प्रति औंस दराने विकलं जात आहे.

चांदीची नवी किंमत (Silver Price on 17 June 2021):

दुसरीकडे दिल्लीतील सराफ बाजारात चांदीच्या किमतीतही पडझड झालेली पाहायला मिळाली. एक किलोग्रॅम चांदीच्या किमतीत 1,709 रुपये घट होऊन 68,798 रुपये दर झाला. बुधवारी (16 जून) हा दर 70,507 रुपये प्रति किलोग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 26.89 डॉलर प्रति औंस आहे.

सोन्याची किंमत कमी होण्यामागे कारण काय?

यूएस फेडरल रिझर्वने दिलेल्या संकेतानुसार लवकरच अपेक्षेपेक्षा जास्त व्याज दर वाढवू शकतात. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत अडीच टक्क्यांहून अधिक टक्के घट झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यात डॉलरची किंमत ही उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तर गेल्या दहा वर्षात यूएस ट्रेझरीच्या उत्पादनात वाढ झाली.

हेही वाचा :

स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…

Gold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती?

Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Gold Silver prices increases Know latest price 18 June 2021

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.