Gold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती?

सोन्याच्या किंमतीने गेल्या एक महिन्यातील निच्चांक पातळी गाठली आहे. फेडरल रिझर्व्हच्या संकेतानंतर हे सोन्याचे दर खाली आले आहेत. (Gold Sliver Price Today New Rate) 

Gold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती?
सोन्याचा दर
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 4:58 PM

मुंबई : जागतिक बाजारपेठेत किंमती घसरल्यामुळे गुरुवारी भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Prices Today) कमालीची घट झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीत 1.61 टक्क्यांनी, तर चांदीच्या किंमतीत 1.64 टक्क्यांनी घसरली आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीने गेल्या एक महिन्यातील निच्चांक पातळी गाठली आहे. फेडरल रिझर्व्हच्या संकेतानंतर हे सोन्याचे दर खाली आले आहेत. (Gold Sliver Price Today New Rate)

सोन्याचा आजचा भाव काय? (Gold Price)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती अडीच टक्क्यांनी खाली आल्या आहेत. त्यानुसार सोन्याचा भाव 1.61 टक्के म्हणजे 782 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सध्या बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 724 रुपये झाला आहे.

चांदीचा दर काय? (Silver Price)

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे चांदीचा दर हा 27.09 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. चांदीचा दर हा 1.64 टक्के म्हणजे 1,174 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिला 70,294 रुपये इतका पाहायला मिळत आहे.

सोन्याची किंमत कमी होण्यामागे कारण काय?

यूएस फेडरल रिझर्वने दिलेल्या संकेतानुसार लवकरच अपेक्षेपेक्षा जास्त व्याज दर वाढवू शकतात. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत अडीच टक्क्यांहून अधिक टक्के घट झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यात डॉलरची किंमत ही उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तर गेल्या दहा वर्षात यूएस ट्रेझरीच्या उत्पादनात वाढ झाली.

सराफा बाजारात सोने-चांदीचे दर काय?

बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली. तर चांदीच्या दरात  मात्र वाढ झाली आहे. बुधवारी दिल्लीत सोन्याचे भाव 48 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे एक तोळे सोन्याची किंमत ही 47,814 रुपये इतकी झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत 340 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर हा प्रतिकिलो 70,589 रुपये इतका झाला आहे.

(Gold Sliver Price Today New Rate)

संबंधित बातम्या : 

Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

देशात आजपासून 256 जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? यादी एका क्लिकवर

Income Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.