दुग्धोत्पादन वाढीसाठी देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणा, राज्यात संकरीत गायींची संख्या वाढली

| Updated on: Dec 15, 2021 | 2:54 PM

दुग्धव्यवसाय शेतीचा मुख्य जोडव्यवसाय आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये जर्सी आणि होलस्टिन या दोन परदेशी जातींच्या गायींची महत्वाची भूमिका आहे. या दोन परदेशी जातीच्या गायी भारतामध्ये आणणे शक्य नसल्याने संकरीणाच्या माध्यमातून त्यांची राज्यात वाढ करण्यात आली आहे.

दुग्धोत्पादन वाढीसाठी देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणा, राज्यात संकरीत गायींची संख्या वाढली
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई: दुग्धव्यवसाय शेतीचा मुख्य जोडव्यवसाय आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये जर्सी आणि होलस्टिन या दोन परदेशी जातींच्या गायींची महत्वाची भूमिका आहे. या दोन परदेशी जातीच्या गायी भारतामध्ये आणणे शक्य नसल्याने संकरीणाच्या माध्यमातून त्यांची राज्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे.  एकीकडे कृषी विद्यापीठात देशी गायींची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे दूध उत्पादनासाठी असे प्रयोग केले जात आहेत.

असे केले जाते कृत्रिम गर्भधारण पध्दतीने रोपण

परदेशातील जर्सी आणि होलस्टिन या जातीच्या बैलाचे वीर्य हे जमा करुन थंड पेट्यामध्ये देशात आणले जाते. त्याच माध्यमातून देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणेच्या पध्दतीने रोपण केले जाते. यातूनच भारतामध्ये संकरीत गायींची पर्यायाने दूधाचे उत्पादनही वाढत आहे. विशेष म्हणजे देशी गायींनी खालेल्या चाऱ्याचे रुपांतर हे मांसामध्ये होते तर तेच संकरीत गायी दुधात रुपांतर करता. हाच गुणधर्म देशी गायींमध्ये उतरवला जात असून त्यातून दुग्धोत्पादन वाढू शकते ही बाब निदर्शनास आल्यानंतरच महाराष्ट्रात जर्सी गायींची पैदास ही वाढत आहे.

होलस्टिन गायीचे काय आहे वेगळेपण?

होलस्टिन गायी ह्या शरीराने मोठ्या असतात. त्यांचे वजन साधारणत: 600 किलो एवढे असते तर सर्वाधिक दूध देणारी गायी म्हणून हीची ओळख आहे. दूधाचे प्रमाण अधिक असले तरी या गायींची योग्य ती देखभाल कराली लागते. कारण जास्त तापमान या गायीला सहन होत नाही तर यांच्या दुधातूल फॅट हे आपल्या देशी गायींच्या तुलनेत कमी असते. दिवासाला होलस्टिन गाई ही 25 ते 30 लिटर दूध देते. आता या संकरीत गायींची संख्या महाराष्ट्रात वाढत आहे. या गायी 50 ते 60 हजार रुपयांना मिळतात.

जर्सी गायीची रोग प्रतिकार शक्ती चांगली

होलस्टन आणि जर्सीमध्ये हे वेगळेपण आहे की, होलस्टन गायीला अधिकचे तापमान सह होत नाही तर जर्सी गायीची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली असते. मात्र, जर्सी दिवसाला केवळ 12 ते 14 लिटर दूध देते. या गायी मध्यम आकाराच्या लाल रंग आणि कपाळ हे रुंद असते. भारतातील वातावरणात या गायी सहज सहन करु शकतात. जर्सी गायीचे वजन हे 400 ते 450 किलो असते मात्र, होलस्टिन गायीपेक्षा किंमत कमी आणि कोणतेही वातावरणात मानवत असल्याने शेतकऱ्यांचा कल जर्सीवर अधिक असतो.

संकरीत गाईचा भाकड कालावधी हा कमीच

संकरीत गायीचा भाकड कालावधी हा केवळ 70 ते 80 दिवसांचा असतो. त्यामुळे दुधाचे उत्पादन तर वाढतेच पण यामध्ये सातत्य राहत असल्याने शेतकऱ्यांना या व्यवसयाची चांगली जोड मिळते. संकरीत गायी ह्या दिवसाला 10 ते 12 लिटर दूध देतात. गाईंचे फॅटही 4 ते 5 असल्याने दुधाला चांगला दर मिळतो. शिवाय या जातीच्या कालवडी 18 ते 20 महिन्याच्या असतानाच माजावर येतात तर पहिली गर्भधारणा ही केवळ 22 व्या महिन्यात होते. दोन वेतातील अंतर केवळ 13 ते 15 महिन्याचे असल्याने दुग्धव्यवसाय परवडतो.

संबंधित बातम्या :

जिनिंग उद्योगावरही ओमिक्रॅानचा परिणाम, राज्यात निम्म्याच क्षमतेने कापूस गाठींचे उत्पादन

Sugar Factory : ऊसगाळप वेगाने, ‘एफआरपी’ चे वाटप मात्र, धिम्या गतीने, कारखान्यांचा मधला मार्ग आला ‘कामी’

अवकाळीच्या नुकसान खुणा, 1 एकरावरील कांद्याचाही प्रयोग फसला, शेतकऱ्याने थेट रोटावेटरच फिरवला