जिनिंग उद्योगावरही ओमिक्रॅानचा परिणाम, राज्यात निम्म्याच क्षमतेने कापूस गाठींचे उत्पादन

जिनिंग उद्योगावरही ओमिक्रॅानचा परिणाम, राज्यात निम्म्याच क्षमतेने कापूस गाठींचे उत्पादन
युध्दजन्य परस्थितीमुळे कापसाचे दर हे स्थिरावले आहेत.

हंगामाच्या सुरवातीला जिनिंग मोठ्या क्षमतेने सुरु झाले होते. शिवाय कापसाला चांगले दरही मिळत असल्याने उत्सहाचे वातावरण होते. मात्र, हंगामा निम्म्यावर आले असतानाच ओमिक्रॅानचे ग्रहन जिनिंग उद्योगालाही लागल्याचे दिसत आहे. ओमिक्रॅानमुळे आंतरराष्ट्राय स्तरावरील व्यवहार हे थंडावले असून त्याचा परिणाम थेट आता राज्यातील जिनिंग उद्योगावर होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 15, 2021 | 10:16 AM

मुंबई : हंगामाच्या सुरवातीला (Ginning Industry) जिनिंग मोठ्या क्षमतेने सुरु झाले होते. शिवाय कापसाला चांगले दरही मिळत असल्याने उत्सहाचे वातावरण होते. मात्र, हंगामा निम्म्यावर आले असतानाच (Omicron) ओमिक्रॅानचे ग्रहन जिनिंग उद्योगालाही लागल्याचे दिसत आहे. ओमिक्रॅानमुळे (International Market) आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहार हे थंडावले असून त्याचा परिणाम थेट आता राज्यातील जिनिंग उद्योगावर होत आहे. आतापर्यंत राज्यातील 500 जिनिंग प्रोसेसमधून 22 लाख गाठींची निर्मिती ही झाली आहे. तर यंदा कापूस हंगामात 70 लाख गाठींची निर्मिती होईल असे संकेत सुरवातीला वर्तवण्यात आले होते. मात्र, सध्या ओमिक्रॅानचा वाढता प्रादुर्भाव, नाताळ्याच्या सुट्ट्या आणि (Cotton Procurement) कापूस दराबाबत अनिश्चितता यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

जोखीम घ्यायची कोणी ?

सध्या ओमिक्रॅान विषाणूची धास्ती तसेच युरोप देशाच नाताळ्याच्या सुट्ट्या आणि कापूस दरवाढीच्या अपेक्षा यामुळे जिनिंग उद्योत संथ गतीने सुरु आहेत. आता पर्यंत या माध्यमातून 22 लाख गाठींची निर्मिती झाली आहे. पण हंगामाच्या सुरवातीची स्थिती ही वेगळी होती. कापसाचे दर आणि आवक ही देखील समाधानकारक असल्याने सर्वकाही सुरळीत होते. पण आता प्रतिकूल परस्थितीमुळे कारखानदार हे सावध झाले आहे. आंतराष्ट्रीय पातळीवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अडचणी असल्याने जोखीम न पत्करलेली बरी म्हणून कापसावरील प्रक्रिया ही रखडत आहे.

शेतकऱ्यांचा कलही साठवणूकीवरच

कापसाचेही सोयाबीनप्रमाणेच झाले आहे. हंगामाच्या सुरवातीला कापसाला 9 हजार 500 चा दर मिळालेला होता. मात्र, आता यामध्ये घट झाली आहे. घटत्या दरामुळे बाजारपेठेतली आवकही कमी झाली आहे. शेतकऱ्यांना आता वाढीव दराची अपेक्षा आहे. विक्रीपेक्षा साठवणूकीवर शेतकरी भर देत आहेत. एकीकडे कापसाचे उत्पादन वाढावे म्हणून फरदड कापसाचे उत्पादन घ्यायचे आणि दुसरीकडे वाढीव दराच्या अपेक्षेसाठी साठवणूक करायची असे धोरण शेतकऱ्यांनी सुरु केले आहे. दिवाळीनंतर कापसाची खरेदी ही कमी झाली होती तर आता ठप्प असल्याचे चित्र आहे.

खेडा खरेदी केंद्रातून होतो कापसाचा पुरवठा

राज्यातील जिनिंग उद्योगांना शक्यतो खेडा येथील केंद्रातीन कापसाचा पुरवठा होतो. पण ओमिक्रॅानमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पडझड झाली आहे. यातच युरोप आणि अमेरिकेत नाताळाचा माहोल असल्याने कापड, गाठींचा बाजार हा थंड आहे. त्यामुळे जिथे मोठ्या कारखान्यातून 400 गाठींचे उत्पादन होत होते ते आता 200 वर येऊन ठेपले आहे. या प्रतिकूल परस्थितीमुळे सध्या खेडाची खरेदी ही ठप्प आहे.

संबंधित बातम्या :

जातीवंत देशी गोवंशसाठी कृषी विद्यापीठाचा अनोखा प्रयोग ? कशी होते भ्रुण प्रात्यारोपण प्रक्रिया

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे..! कशासाठी केले जाते माती परिक्षण, काय आहेत फायदे ?

टेक्नो बळीराजा: शिवार ते मार्केट; अ‍ॅपच्या एका क्लिकवर माहितीचा खजाना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें