जातीवंत देशी गोवंशसाठी कृषी विद्यापीठाचा अनोखा प्रयोग ? कशी होते भ्रुण प्रात्यारोपण प्रक्रिया

सुपरव्यूलेशन प्रणालीचा वापर करून हेच प्रमाण 2 ते 3 प्रति वर्ष केले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या वापराने दूधाचे उत्पादन तर वाढतेच पण गोठ्यात चांगल्या दुधाळ गाईंचे संवर्धन शक्य होते. त्याचअनुशंगाने पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन केंद्रामध्ये जातिवंत दुधाळ देशी गोवंशाच्या पैदाशीसाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.

जातीवंत देशी गोवंशसाठी कृषी विद्यापीठाचा अनोखा प्रयोग ? कशी होते भ्रुण प्रात्यारोपण प्रक्रिया
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 9:00 AM

लातूर : दूधाचे उत्पादन वाढीवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. असे असले तरी जातीवंत गाई ही वर्षातून एकदाच वासरला जन्म देऊ शकते. त्यामुळे दूधाचा काळ हा मर्यादितच राहू शकतो. मात्र, परंतु सुपरव्यूलेशन प्रणालीचा वापर करून हेच प्रमाण 2 ते 3 प्रति वर्ष केले जाऊ शकते. या ( Technology) तंत्रज्ञानाच्या वापराने दूधाचे उत्पादन तर वाढतेच पण गोठ्यात चांगल्या दुधाळ गाईंचे संवर्धन शक्य होते. त्याचअनुशंगाने पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन केंद्रामध्ये जातिवंत दुधाळ (embryo transplant) देशी गोवंशाच्या पैदाशीसाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे. या केंद्रामध्ये गीर, राठी, थारपारकर, आणि साहिवाल या देशी गोवंशाच्या जातिवंत पैदास केली जाणार आहे.

जातिवंत गोवंशाचे संवर्धन अन् पैदास

प्रत्यारोपणाच्या या तंत्रज्ञानामुळे जातिवंत गाईंचे संवर्धन आणि पैदासही होणार आहे. यामध्ये विद्यापीठातील पशूसंवर्धन क्षेत्रातील 27 गाई, कृषी महाविद्यालयातील 11 गाईंमध्ये भ्रूण प्रात्यारोपण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर काही दिवसांमध्ये महात्मा फुले कृषी महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातील 200 गाईंमध्ये असे प्रात्यारोपण केले जाणार असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख डॅा. सोमनाथ माने यांनी सांगितले आहे…

नेमकी कशी होते प्रत्यारोपणाची प्रक्रिया

*यामध्ये गाईमध्ये गर्भरोपण केले जाते. त्यानंतरच्या आठवड्यात गर्भ पिशवीतून गर्भ काढले जाते. यामध्ये गर्भाशय ग्रिव्हामधून गर्भाशयामध्ये कॅथेटर ठेवले जाते, जिथे गर्भाशयातून भ्रूण गोळा करण्यासाठी कफ फुगविला जातो आणि द्रव आतून बाहेर काढला जातो. एका फ्लशमध्ये सरासरी पाच गर्भ तयार होतात. *हे गर्भ त्यांच्या इस्ट्रस सायकलमध्ये एकाच टप्प्यावर असलेल्या, परंतु गाभण नसलेल्या सरोगेट गाईमध्ये गर्भरोपण केले जाते. *जातिवंत दुधाळू गाई 75 ते 90 टक्के सुपर ओव्हुलेशन उपचारांना प्रतिसाद देतात, परंतु 20 ते 30 टक्के गायींचे भ्रूण तयार होत नाहीत. एफएसएचफ उपचारांना यशस्वीरीत्या प्रतिसाद देणाऱ्या गायींमध्ये चांगल्या प्रतीचे गर्भ तयार करण्याचे प्रमाण खूप चांगले आहे.

काय आहेत या तंत्रज्ञानाचे फायदे

*दुधाळू उच्च प्रतीच्या गाईंचा पुनरुत्पादक दर वाढतो. त्यामुळे दूधाचे उत्पादन तर वाढतेच पण चांगल्या जातीवंत गाईंचेही संवर्धन होते. *शस्त्रक्रियाविना भ्रूण ताजे हस्तांतरित केले जाऊ शकतात किंवा प्रयोगशाळेमध्ये गोठविले जाऊ शकतात. *भविष्यातील उच्च प्रतीच्या गाईंचे संवर्धन शक्य.

संबंधित बातम्या :

फुलांच्या उत्पादनात 50 टक्क्यांची घट तर दरामध्ये दुप्पट वाढ, काय आहेत कारणे ?

Latur Market | सोयाबीनचे दर घटले अन् पुन्हा स्थिरावले, शेतकऱ्यांची मात्र द्विधा मनस्थिती

पंतप्रधान पीक विमा योजना : शेतकऱ्यांना 100 रुपयांच्या प्रीमियमवर किती मिळते नुकसानभरपाई?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.