शेतकऱ्यांसाठी महत्वाचे..! कशासाठी केले जाते माती परिक्षण, काय आहेत फायदे ?

उत्पादन वाढीसाठी आवश्यक असते ते मातीचे आरोग्य. मात्र, या महत्वाच्या बाबीकडेच शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. काळाच्या ओघात शेतीव्यवसयात अमूलाग्र बदल झाले पण आजही या मूलभुत गोष्टीकडे दुर्लक्षच होत आहे. शेतातील मातीच्या नमुन्यांचे भौतिक, रासायनिक जैविक पृथक्करण करून त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपसाणे हे महत्वाचे असते.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे..! कशासाठी केले जाते माती परिक्षण, काय आहेत फायदे ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 8:00 AM

लातूर : उत्पादन वाढीसाठी आवश्यक असते ते मातीचे आरोग्य. मात्र, या महत्वाच्या बाबीकडेच शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. काळाच्या ओघात शेतीव्यवसयात अमूलाग्र बदल झाले पण आजही या मूलभुत गोष्टीकडे दुर्लक्षच होत आहे. शेतातील मातीच्या नमुन्यांचे भौतिक, रासायनिक जैविक पृथक्करण करून त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपसाणे हे महत्वाचे असते. यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावे त्याचा किती उतार पडेल या सर्व बाबींचा अंदाज यामधून बांधता येतो. त्यामुळेच माती परिक्षण कसे केले जाते याची माहिती आपण आज घेणार आहोत. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते.

नेमका माती परिक्षणाचा काय होतो फायदा?

  • जमिनीच्या प्रतिनुसार पिकाची निवड व नियोजन करता येते. जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येते. आवश्यक तेवढेच खत व संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे आर्थिक बचत व उत्पादन क्षमता टिकून राहते. प्रत्येक विभागातून 10 ते20 ठिकाणाचे मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात किंवा स्वच्छ पोते यावर घ्यावे. त्याचे चार समान भाग करून समोरासमोरचे दोन भाग पूर्ण घ्यावेत. अशाप्रकारे अर्धा किलो माती होईपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी.

मातीचा नमुना घेण्याची पद्धत

शेतातील मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेणे ही माती परीक्षण कार्यक्रमात सर्वात महत्वाची बाब आहे. मातीच्या नमुन्याचे पृथक्करण अत्याधुनिक उपकरणाद्वारे केले जाते. मातीचा नमुना जर त्या शेताचा प्रतिनिधीक नमुने कधीही काढता येतात. मात्र, पाऊस पडल्यानंतर, पाणी दिल्यानंतर आणि वाफसा नसताना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुने काढु नयेत. जमिनीत पीक घेण्याच्या हंगामापुर्वी नमुने घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी कोणते अन्नद्रव्य ही शेतजमिनीत आहेत हे समजणार आहे.

मातीचा नमुना काढताना घ्यावयाची काळजी

1) सर्वसाधारणपणे मातीचा नमुना शेत नांगरण्यापूर्वी घ्यावा. 2) शेतात जनावरे बसण्याची जागा, खत, कचता टाकण्याच्या जागा, विहिरीचे आणि शेताचे बांध या जागेतुन मातीचे नमुने घेऊ नयेत. 3) शेतात रासायनिक खते टाकली असल्यास 2 ते 2 महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये. 4 ) निरनिराळया प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळया शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळु नयेत. 5) झाडाखालील, पाणथळ जागेतील व माती वाहुन गेलेल्या जागेतील मातीचा नमुना घेऊ नये. 6 ) ठिंबक सिचन असल्यास वेटिंग बॉलच्या कडेचा नमुना घ्यावा.

मातीच्या नमुन्याबरोबर या बाबी आहेत महत्वाच्या

मातीचा नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरून खालील माहिती भरून प्रयोगशाळेकडे पृथक्करणासाठी पाठवावा. याबरोबर शेतकऱ्यांचे नाव व पत्ता, नमुना घेतल्याची तारीख व नमुना घेतलेल्या जमिनीची खोली, गट नंबर व एकुण क्षेत्र, जमिनीचा प्रकार व खोली, मागील हंगामात घेतलेले पीक व पुढील हंगामात घेण्याचे पीक व जात याची माहितीही देणे आवश्यक राहणार आहे.

संबंधित बातम्या :

फुलांच्या उत्पादनात 50 टक्क्यांची घट तर दरामध्ये दुप्पट वाढ, काय आहेत कारणे ?

Latur Market | सोयाबीनचे दर घटले अन् पुन्हा स्थिरावले, शेतकऱ्यांची मात्र द्विधा मनस्थिती

पंतप्रधान पीक विमा योजना : शेतकऱ्यांना 100 रुपयांच्या प्रीमियमवर किती मिळते नुकसानभरपाई?

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.