Nanded: वाढत्या उन्हामुळे भुईमूगाचे उत्पादन घटलं अन् मान्सूनपूर्व सरीने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली

| Updated on: May 20, 2022 | 10:08 AM

निसर्गाचा लहरीपणा असला तरी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. खरिपातील नुकसानीनंतर उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी सर्वकश प्रयत्न केले आहेत. यंदा नांदेडमध्ये ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने भूगर्भातील पाणीपातळी चांगलीच वाढली होती. त्यामुळे ऐन उष्णतेच्या लाटेत देखील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता आली आहेत.

Nanded: वाढत्या उन्हामुळे भुईमूगाचे उत्पादन घटलं अन् मान्सूनपूर्व सरीने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली
पावसाच्या हजेरीमुळे आता भुईमूग काढणीला वेग आला आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : निसर्गावर (Farming) शेती व्यवसाय कसा अवलंबून आहे याचा प्रत्यय गत (Kharif Season) खरिपाच्या हंगामापासून येत आहे. सध्या शेत शिवारामध्ये उन्हाळी पिके उभी आहेत. असे असताना 8 दिवसांपूर्वी वाढत्या उन्हामुळे भुईमूगाच्या शेंगाच पोसल्या नव्हत्या तर आता काढणीच्या दरम्यान बरसत असलेल्या (Rain) पावसाच्या सरीमुळे पीक काढणीच्या दरम्यान शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. पीक पेरणी असो किंवा काढणी यावर निसर्गाच्या लहरीपणाचा प्रभाव हा जाणवतोच. सध्या मराठवाड्यात भुईमूगची काढणी जोमात सुरु आहे. पावसामुळे आता नुकसान होऊ नये म्हणून आख्खं शेतकरी कुटुंब राबत असून पीक काढणीवर भर दिला जात आहे.

तिहेरी पीक, उत्पादनात वाढ

निसर्गाचा लहरीपणा असला तरी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. खरिपातील नुकसानीनंतर उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी सर्वकश प्रयत्न केले आहेत. यंदा नांदेडमध्ये ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने भूगर्भातील पाणीपातळी चांगलीच वाढली होती. त्यामुळे ऐन उष्णतेच्या लाटेत देखील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता आली आहेत. विशेष म्हणजे सोयाबीन नंतर हरभराचे पीक घेऊन त्या नंतर शेतकऱ्यांनी भुईमूग पीक घेतल्याचे चित्र यंदा प्रथमच दिसलंय.

नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्याच्या वातावरणात बदल झाला आहे. उन्हाची तीव्रता ही कमी झाली असून ढगाळ वातावरण आहे. तर लातूर, नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी हा पाऊश पोषक असला तरी शेतामध्ये उभी असलेली पिके धोक्यात आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा पावसाला लवकर सुरवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याचाच हा प्रत्यय असून मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने तर हजेरी लावली आहेच पण इतरत्र ढगाळ वातावरण कायम आहे.

हे सुद्धा वाचा

भुईमूगाच्या उत्पादनात घट होण्याचा धोका

शेतकऱ्यांनी यंदा तिहेरी उत्पादन घेण्याचा विक्रम केला असला तरी उत्पादनाच्या दृष्टीने नेमके काय साधले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उन्हाळी भुईमूगाला कडाक्याच्या उन्हाचा आणि आता पावसाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वीच्या उन्हामुळे शेंगा ह्या पोसल्या गेल्या नव्हत्या तर आता अंतिम टप्प्यात पावसामुळे थेट शेंगावरच परिणाम होणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. निसर्गाचा लहरीपणा असतानाही पिकलेलं पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.