शेळीपालनातून कमी खर्चात मोठं उत्पन्न, छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना कमाईची चांगली संधी

| Updated on: Jul 04, 2021 | 11:26 AM

देशातील छोटे आणि सीमांत शेतकरी जास्तीच्या उत्पन्नासाठी पशुपालन करतात. कुक्कुटपालनाव्यतिरिक्त शेळी आणि बकरी पालन अनेक शतकांपासून चालू आहे.

शेळीपालनातून कमी खर्चात मोठं उत्पन्न, छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना कमाईची चांगली संधी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली: देशातील छोटे आणि सीमांत शेतकरी जास्तीच्या उत्पन्नासाठी पशुपालन करतात. कुक्कुटपालनाव्यतिरिक्त शेळी आणि बकरी पालन अनेक शतकांपासून चालू आहे. शेळीपालनाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते. या कारणास्तव, शेतकरी शेळ्या आणि बकऱ्या सहजपणे पाळतात आणि त्यांना इतर कोणतीही अडचण नसते. शेळी आणि बकऱ्यांची योग्य काळजी घेतल्यास शेळीपालनापासून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. यामुळेच गेल्या पाच वर्षात शेळी आणि बकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. (farmers can earn extra income from goat rearing bakri palan )

2012 च्या पशुगणनेनुसार पशुधनात 6.6 टक्के वाढ झाली आहे. 2012 मध्ये पशुधन लोकसंख्या 51.20 कोटी होती. 2019 च्या आकडेवारीनुसार 53 कोटी 57 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. देशातील एकूण पशुधनात शेळ्यांचा वाटा 27 टक्के आहे. म्हणजे शेळ्यांची संख्या 10 टक्क्यांनी वाढून 14.9 टक्के झाली आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, गायी आणि म्हैशी पाळणारे शेतकरी शेळी आणि बकरी पालन करण्याकडे वळत आहेत.

गरीबांची गाय शेळी

शेळीपालन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी खर्चात अधिक नफा हे सूत्र होय. शेळी आणि बकरीचा अनेक कारणांसाठी उपयोग होतो. देशातील भूमिहीन, लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यास शेळीपालनाचा महत्वाचा हातभार लाभतो. त्यामुळे शेळीला गरीब शेतकऱ्यांची गाय असं म्हटलं जातं.

कमी सुपीक जमिनीत वाढणारी झुडपे आणि झाडे यांची पाने शेळ्या खातात त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिकूल वातावरणामध्ये टिकू शकतात. शेळी पालन व्यवसायात सुरुवातीता खर्च कमी आहे. इतर प्राळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळीचा प्रजनन काळ कमी आहे. कोलेस्टेरॉल कमी असल्यामुळे शेळी, बकरी आणि बोकडाच्या मांसाला खूप मागणी असते. त्याचबरोबर गायीच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध सहज पचवता येते.

शेळीपालनासाठी शासनाचं अनुदान

पशुपालकांनी उत्पादनाचे ध्येय ठेऊन शेळीची जात निवडावी. जमुनापारी, सिरोही, बार्बारी आणि जाखराणा जातीच्या शेळ्यांचं पालन साधारणपणे केलं जातं. एका शेळी आणि बकरीला अंदाजे एक चौरस मीटर क्षेत्र आवश्यक असते. या आधारावर आपण शेळ्यांसाठी घरे तयार करू शकता. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळी आणि बकरीला कमी चारा लागतो. सामान्यतः बकरीला दोन किलो चारा आणि अर्धा किलो धान्य देणे चांगले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेळी आणि बकरी पालन करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. यासाठी 25 ते 33.3 टक्के अनुदान केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिलं जातं आहे. शेळीपालनाच्या यशस्वी व्यवसायासाठी ते निरोगी राहणे आवश्यक आहे. आजार झाल्यास त्वरित उपचार दिले पाहिजेत. बहुतेक रोग केवळ पाऊस पडल्यासच होण्याची शक्यता असते, या काळात शेतकऱ्यांनी शेळी आणि बकऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

इतर बातम्या

‘कंपन्यांच्या नफेखोरीतील अडथळे दूर करण्यासाठी कृषी कायद्यात बदल’, शेतकरी संघटना आक्रमक

कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, लासलगांव बाजारसमितीत 1315 कोटींची उलाढाल

(farmers can earn extra income from goat rearing bakri palan )