कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, लासलगांव बाजारसमितीत 1315 कोटींची उलाढाल

कोरोनाचं संकट असतानाही लासलगाव बाजारसमितीमध्ये गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 1315 कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, लासलगांव बाजारसमितीत 1315 कोटींची उलाढाल
लासलगांव बाजार समिती

नाशिक: आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. लासलगांव बाजार समितीत कोरोना काळात अनेक दिवस शेतीमालाचे लिलावाचे कामकाज बंद राहून ही शेतीमालातून सुमारे 1315 कोटी रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. यापैकी 939 कोटींची फक्त कांद्याची उलाढाल झाली, असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. (Nashik Lasalgaon APMC 1315 crore turnover during 2020-21 economic year during corona)

अर्थव्यवस्थेला शेतीनं तारलं

कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसत व्यवसाय ठप्प झाले. मात्र, कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाला यंदा कोरोना काळात प्रचंड प्रादुर्भाव असताना देखील शेती मालाने तारले असल्याचे दिसून आले आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीत एप्रिल 2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षात 1314 कोटी 80 लाख 98 हजारांची उलाढाल झाली. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेक दिवस बाजार समितीतील लिलावाचे कामकाज बंद असतानाही 81 लाख 43 हजार क्विंटल शेतीमालाची आवक झाली.

कांद्याची उलाढाल 939 कोटी

लासलगांव बाजार समिती कांदा, धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंब, यासह आदी शेतीमाल विक्रीसाठी येत आहे. यातून फक्त कांदा विक्रीतून 939 कोटींची उलाढाल झाली आहे. बाजार समितीत पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवहार आणि कामकाजामुळे शेतकऱ्यांची पहिली पसंती ही लासलगाव बाजार समितीला आहे.

अमावस्येला लिलाव सुरु

गेल्या 75 वर्षांपासून अमावस्येला बंद असलेले कांद्याचे लिलाव तसेच शनिवारी देखील कांदा लिलाव पूर्ण दिवस बंद राहत होते. यादिवशी पूर्ण वेळ कांदा लिलाव सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने येणाऱ्या आर्थिक वर्षात नक्कीच यापेक्षाही अधिकची मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी व्यक्त केली.

मागील 5 वर्षातील शेतमाल आवक आणि उलाढाल

– सन 2016-17 53 लाख 80 हजार क्विंटल   – 417 कोटी
– सन 2017-18 – 68 लाख 82 हजार क्विंटल-1098 कोटी
– सन 2018-19 – 76 लाख 92 हजार क्विंटल -643 कोटी
– सन 2019-20 – 72 लाख 78 हजार क्विंटल -1419 कोटी
– सन 2020-21 – 81 लाख 43 हजार क्विंटल -1314 कोटी

मागील 5 वर्षातील कांदा उलाढाल

– सन 2016-17 – 236 कोटी
– सन 2017-18 – 831 कोटी
– सन 2018-19 – 416 कोटी
– सन 2019-20 – 1141 कोटी
– सन 2020-21 – 939 कोटी

इतर बातम्या:

चंद्रकांत पाटील म्हणाले अमित शाहांना पत्र लिहिणार, उदय सामंत म्हणतात हा तर सहकार मोडण्याचा डाव

भारताच्या बासमती तांदळाचा जगभर डंका, 125 देशांमध्ये 30 हजार कोटींची निर्यात

(Nashik Lasalgaon APMC 1315 crore turnover during 2020-21 economic year during corona)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI