शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांकडून पेरुचं नवं वाण विकसित, लाखो रुपये कमवण्याची संधी

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नांना शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांचं सहकार्य मिळत आहे.

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांकडून पेरुचं नवं वाण विकसित, लाखो रुपये कमवण्याची संधी
पेरु

नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नांना शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांचं सहकार्य मिळत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होण्यासाठी फळ आणि भाज्यांची नव्या वाणांवर संशोधन केलं जात आहे. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पेरुचं नवीन वाण तयार केलं आहे. त्या वाणाला अर्का किरण हे नाव देण्यात आलं आहे. शेतकरी या वाणाच्या पेरुची झाडं लावून चांगले पैसे मिळवत आहेत. (Farmers earning in lakhs by the special variety of guava Arka Kiran know all about it)

अर्का किरण पेरूमध्ये लाइकोपीनचे प्रमाण जास्त असते. अर्का किरण पेरुच्या 100 ग्रॅममधेय 7.14 मिलीग्रॅम लाइकोपीन आढळतं हे इतर वाणांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. लाइकोपीन आरोग्यासाठी चांगले असते. हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. अर्का किरण पेरु थोडे कठिण असतात मात्र आतून थोडेसे हलक्या लाल रंगाचा असतो. फळाचा आकार गोलाकार असून याचे पेरु मध्यम आकाराचे असतात.

इतर पेरुंच्या तुलनेत लवकर तोडा

अर्का किरण जातीचे पेरु व्यावसायिक दृष्टीनं महत्वाचे आहेत. अर्का किरण वाणाचे झाडाला जास्त प्रमाणात पेरु लागतात. पेरुच्या इतर जातीच्या अर्का किरण जातीचे पेरु लवकर पिकतात. इतर पेरु बाजारात विक्री होण्यासाठी लवकर येतात, त्यामुळे शेतकरऱ्यांना देखील चांगला दर मिळतो..

एका एकरात किती झाडं लावायची?

पेरुचं अर्का किरण वाणल मंगळुरु येथील संशोधन संस्थेने तयार केले आहे. शेतकरी देखील अर्का किरण जातीच्या पेरुंची लागवड करण्याडे वळत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मंगळुरु येथे जाऊन यासाठी प्रशिक्षण देखील घेतलं आहे. आता ते शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. एका एकरात पेरुची दोन हजार रोपं लावावी लागतात. एक मीटर आणि दोन मीटर अंतरावर लावली जातात.शेतकरी अर्का किरण जातीच्या रोपांची लागवड फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये करु शकतात. काही शेतकरी पेरुंवर प्रक्रिया देखील करतात.

इतर बातम्या:

‘कंपन्यांच्या नफेखोरीतील अडथळे दूर करण्यासाठी कृषी कायद्यात बदल’, शेतकरी संघटना आक्रमक

कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, लासलगांव बाजारसमितीत 1315 कोटींची उलाढाल

Farmers earning in lakhs by the special variety of guava Arka Kiran know all about it

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI