Grape : द्राक्ष बागांमध्येच कशामुळे पेटत आहेत शेकोट्या ? लागवडीपासून तोडणीपर्यंत जीवघेणी कसरत

| Updated on: Jan 10, 2022 | 11:13 AM

अवकाळी, अतिवृष्टीचाच नाही तर वातावरणात थोडा जरी तर शेतकऱ्यांची कसरत सुरु होते. आता दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. आता तापमानात कमालीची घट झाल्याने द्राक्षाला तडे जात आहेत. त्यामुळे द्राक्षांना ऊब देण्यासाठी बागांमध्ये जागोजागी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे.

Grape : द्राक्ष बागांमध्येच कशामुळे पेटत आहेत शेकोट्या ? लागवडीपासून तोडणीपर्यंत जीवघेणी कसरत
वाढत्या थंडीपासून द्राक्षांचे नुकसान होऊ नये म्हणून लासलगाव तालुक्यात द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या पेटवून ऊब दिली जात आहे.
Follow us on

लासलगाव : (Untimely rain) अवकाळी, अतिवृष्टीचाच नाही तर वातावरणात थोडा जरी तर शेतकऱ्यांची कसरत सुरु होते. आता दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. आता तापमानात कमालीची घट झाल्याने द्राक्षाला तडे जात आहेत. त्यामुळे (vineyard) द्राक्षांना ऊब देण्यासाठी बागांमध्ये जागोजागी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. लागवडीपासून ते तोडणीपर्यंत द्राक्ष बागेची योग्य जोपासना केली तरच हे पीक पदरात पडणार आहे. त्यामुळे शेतकरी स्वत: गारठ्यामध्ये राहून द्राक्षांना उब देण्याचे काम करीत आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पारा 6 अंश सेल्शिअस, म्हणून पेटल्या शेकोट्या

ढगाळ वातावरण आणि पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी गायब झाली होती. मात्र, आता आकाश निरभ्र झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पुन्हा वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे वातावरणात अचानक गारठा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण निफाड तालुका थंडीने गारठुन निघाला आहे. या थंडी पासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जातात आहे तसेच याचा थेट परिणाम हा शेती पिकावरील होता असल्यामुळे द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवून शेतकरी ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण

वाढत्या थंडीचा परिणाम द्राक्ष बागांवर होत असला तरी ही गुलाबी थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांसाठी फायद्याची ठरत आहे. यामुळे पिकांची वाढ जोमात होत असून ज्वारी ही पोटऱ्यात आली आहे. थंडीमुळे कांदा पिकावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. तर गहू, हरभरा या पिकांची वाढ जोमात होत आहे. एकीकडे थंडीमुळे द्राक्षांचे नुकसान होत असले तरी दुसरीकडे रब्बीसाठी याचा फायदाही आहे. त्यामुळे कही खुशी कही गम अशीच अवस्था झाली आहे.

काय आहे शेतकऱ्यांचे म्हणने?

समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या निफाड तालुक्यात नेहमीच थंडीच्या हंगामात गारठून टाकणारी थंडी राहते यामुळे द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. फुगवणीला आलेल्या द्राक्ष मण्यांना वाढत्या थंडीमुळे तडे जाण्याची भीती असते. त्यामुळे ड्रीप द्वारे पाणी देणे, द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवून ऊब निर्माण केली जात असल्याचे द्राक्ष उत्पादक चंद्रभान जाधव सांगत आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या मनात तोच दर बाजारात, खरिपातील केवळ एका पिकाचा शेतकऱ्यांना दिलासा

Chickpea Crop : हरभरा फुलोऱ्यात, घाटीअळीचे करा असे एकात्मिक व्यवस्थापन

‘ई-पीक पाहणी’ आता ‘ई- गिरदावरी’, महाराष्ट्रातील यशानंतर राजस्थानात राबवला जाणार हा उपक्रम