Chickpea Crop : शेतकऱ्यांनो हमीभावाचाच घ्या आधार अन्यथा होईल नुकसान, ऊन-पावसाच्या खेळात घटले उत्पादन

| Updated on: Mar 27, 2022 | 12:27 PM

यंदा विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात आता पीक काढणीला सुरवात झाली असून कृषी विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे उत्पादन होताना पाहवयास मिळत नाही. हरभऱ्याची आयात, नाफेडची खरेदी आणि आता नव्याने दाखल होत असलेला हरभरा यामुळे बाजारपेठेतील दर वाढतीलच असे नाही. जे सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत झाले तशी परस्थिती हरभऱ्याच्या बाबतीमध्ये नाही.

Chickpea Crop : शेतकऱ्यांनो हमीभावाचाच घ्या आधार अन्यथा होईल नुकसान, ऊन-पावसाच्या खेळात घटले उत्पादन
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us on

लातूर : यंदा विक्रमी क्षेत्रावर (Chickpea Crop) हरभऱ्याचा पेरा झाला आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात आता पीक काढणीला सुरवात झाली असून (Agricultural Department) कृषी विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे उत्पादन होताना पाहवयास मिळत नाही. हरभऱ्याची आयात, (NAFED) नाफेडची खरेदी आणि आता नव्याने दाखल होत असलेला हरभरा यामुळे बाजारपेठेतील दर वाढतीलच असे नाही. जे सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत झाले तशी परस्थिती हरभऱ्याच्या बाबतीमध्ये नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या दराची वाट पाहता खरेदी केंद्रावरील हमीभावानेच विक्री केली तर अधिकचा फायदा होणार असल्याचे शेतीमाल बाजार अभ्यासक अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

तीन महिन्यानंतरही खुल्या बाजारात कमीच दर

रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की बाजारपेठेतील दर वाढतील मात्र खुल्या बाजारपेठेतील आणि हमीभाव खरेदी केंद्रावरील दर यामध्ये मोठी तफावत आहे. खुल्या बाजारात 4 हजार 200 ते 4 हजार 600 पर्यंतचा दर आहे तर हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर नाफेडने ठरवून दिला आहे. आवक अशीच चालू राहिली तर हमीभावाप्रमाणे बाजारातील दर होण्यास किमान 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच हमीभावाचा आधार घेतला तर फायद्याचे राहणार आहे. राज्यात सर्वत्र हमीभाव केंद्र ही सुरु करण्यात आली आहेत.

हमीभाव केंद्रावर 86 हजार टन हरभऱ्याची खरेदी

नाफेडच्या माध्यमातून यंदा 15 लाख टन हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी महाराष्ट्रातून 6 लाख 80 हजार टनाची खरेदी केली जाणार आहे. आतापर्यंत मात्र, 86 हजार टनाची खरेदी राज्यातून झालेली आहे. गेल्या महिन्यापासून केंद्र सुरु झाली आहेत. अगोदर नोंदणी त्यानंतर खरेदी आणि 15 दिवसांनी पुन्हा पैसे या प्रक्रियेमुळे शेतकरी थेट खुल्या बाजारात विक्री करीत आहे. मात्र, नाफेडच्या कारभरात तत्परता दाखवून खरेदीमध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बाजारात दर कमी असल्याने नाफेडची खरेदी वाढेल असा अंदाज आहे.

हमीभावच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा

आता कुठे नवीन हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. आवक अशीच कायम राहिली तर उलट बाजारातील दर अणखी कमी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी क्विंटलमागे होणारे नुकसान पाहता खरेदी केंद्रच जवळ करणे गरजेचे आहे. सध्याच्या आवकनुसार तीन महिन्यानंतर खुल्या बाजारात हरभरा 5 हजार 230 पर्यंत जाईल असा अंदाज आहे. सोयाबीन, तूर, कापूस यांचे मूळात उत्पादनच कमी झाले होते. मात्र हरभऱ्याची स्थिती ही वेगळी आहे. त्यामुळे खरेदी केंद्राचाच आधार शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Farmer : कर्जमाफी नाही तर कर्ज परतफेड कसली ? सहकार मंत्र्यांकडून एक घाव दोन तुकडे असा निर्णय..!

पिंपळगाव बाजार समितीच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांचा फायदा, समितीमधील व्यवहारात आता नियमितता

Nanded : सोयाबीन दर वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना मोबदला चोरट्यांना, भाव वाढताच शेतीमालावरच डल्ला