पिंपळगाव बाजार समितीच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांचा फायदा, समितीमधील व्यवहारात आता नियमितता

बाजार समितीमधील व्यवहारातून शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील मतभेद हे काही नवीन नाहीत. अनेकवेळा यावरुन मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत. शेतीमाल घेताना मापात पाप, शेतीमालीची नासाडी अशा अनेक घटनांमुळे हे मतभेद वाढत आहेत. यावर पिंपळगाव बाजार समितीच्या प्रशासनाने रामबाण उपाय शोधला आहे. गैरव्यवहार टाळावेत आणि कामात पारदर्शकता यावी याकरिता आता लिलाव हे सीसीटीव्ही च्या निगराणीमध्ये होणार आहे.

पिंपळगाव बाजार समितीच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांचा फायदा, समितीमधील व्यवहारात आता नियमितता
पिंपळगाव बाजार समितीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 11:06 AM

लासलगाव :  पिंपळगाव बाजार समितीमधील व्यवहारातून शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील मतभेद हे काही नवीन नाहीत. अनेकवेळा यावरुन मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत. शेतीमाल घेताना मापात पाप, शेतीमालीची नासाडी अशा अनेक घटनांमुळे हे मतभेद वाढत आहेत. याव (Pimpalgaon)र पिंपळगाव (Market Committee) बाजार समितीच्या प्रशासनाने रामबाण उपाय शोधला आहे. गैरव्यवहार टाळावेत आणि कामात पारदर्शकता यावी याकरिता आता लिलाव हे (CCTV) सीसीटीव्ही च्या निगराणीमध्ये होणार आहे. यापूर्वी बाजार समितीमध्ये इलेक्ट्रीक वजनकाटे वापरण्याचे आदेश पणन महासंघाने दिले होते. आता सीसीटीव्हीचा निर्णय हा बाजार समिती प्रशासन स्तरावर घेण्यात आला आहे. याच्या अंमलबाजवणीमुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळणार आहे. शिवाय या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.

यामुळे भासली गरज

पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्यासह इतर शेतीमालाची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच वजनकाट्यावरुन शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये अनेक वेळा वादही निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकर्‍यांशी मनमानी करणाऱ्या आडतदार व्यापाऱ्यांना लिलावात चाप बसावा व पारदर्शी व्यवहारासाठी बाजार समितीच्या आवारात सीसीटीव्ही कार्यान्वित करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

8 आडत्यांचे परवाने रद्द

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची उभारणी झालेली आहे. असे असतानाही व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे निदर्शनास येताच येथील प्रशासनाने 8 आडत व्यापाऱ्यांचे वर्षभरासाठी परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना आता वर्षभर शेतीमाल खरेदी करता येणार नाही. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास सभापती बनकर यांनी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची मागणी होत होती पण मध्यंतरी बाजार समिती आवारात असे गैरप्रकार समोर येऊ लागल्याने बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत हा सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबादमध्येही घडला होता मारहाणीचा प्रकार

शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव का देतो, असं म्हणत एका व्यापाऱ्याला गुंड व्यापाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना औरंगाबादेत घडली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील करंजखेडा बाजार समितीत हा प्रकार घडला होता. एका व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल घेताना त्याला चांगला त्याला चांगला भाव दिला. मात्र यामुळे संतापलेल्या दुसऱ्या व्यापाऱ्याने त्याला जाब विचारला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याची बाजू घेणाऱ्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली होती.

संबंधित बातम्या :

Nanded : सोयाबीन दर वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना मोबदला चोरट्यांना, भाव वाढताच शेतीमालावरच डल्ला

Nanded : तोडणीअभावी सर्वात मोठ्या नगदी पिकाचे नुकसान, हंगाम अंतिम टप्प्यात तरीही ऊस फडात

Orchard Cultivation: पारंपरिक पिकांना डावलून फळबाग क्षेत्रात वाढ,योजनांचा लाभ उत्पादनात वाढ अन्

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.